If you are trying to reset your account password then don't forget to check spam folder in your mailbox. Also Mark it as "not spam" or you won't be able to click on the link.
वैष्णवी आणि तिच्या चुलत बहिणी रेखा आणि शारदा साड्या पाहत होत्या. शारदा तिच्या लहान काकांची मुलगी तर रेखा मोठ्या बाबांची.त्याच्या गोष्टी चालू होत्या.
"वैष्णवी, एक विचारू?" शारदाने म्हणाली.
वैष्णवी: "हो विचार."
शारदा: "तुला कोणता मुलगा आवडतो का?"
प्रश्न ऐकून रेखाने डोळे मोठे करून शारदा कडे पहिल. पण वैष्णवी फक्त हसली.
वैष्णवी:"आवडतो म्हणजे?"
शारदा:"हेच की कोणी असा नाही का ज्याच्या साठी तू जीव देशील."
रेखा:"शारदा, काय बोलत आहे तू? समजते ना तुला, स्वतःकडे पाहा ना, पोटात बाळ आहे आणि असल्या गोष्टी सुचते तुला."
शारदा:"असल्या गोष्टीमुळेच तर पोटात बाळ आहे." एवढी बोलून खिळखिळत हसली.
शारदा:"पण खरच, असा कोणी नाही का तुझा?"
वैष्णवी:"ताई तू ही ना खूप विचित्र आहे, कशाला असणारं आहे कोणी, आणि जीवा पड्याल प्रेम वगेरे खूप फिल्मी नाही का ते."
शारदा:"आयुष्य फिल्मी असण्यात काय चुकीचं आहे, आणि आयुष्यात काही गोष्टी तर्काच्या पलीकडे असतात आणि प्रेम त्यातली एक गोष्ट आहे, चंद्र तारे भलेही कोणी तोडणार नाही पण शब्द बोलणारा जरी असला तरी खूप आहे. "
रेखा:"ओ हो वाटलं नव्हत ज्ञानेश्वर राव इतके रोमँटिक आहे म्हणून."
हे ऐकून शारदा थोडी लाजली पण आता वैष्णवी आणि रेखा दोघी ही जोरात हसत होत्या.
शारदा:"जा तुम्ही दोघी ही, तुम्हाला माणसांच्या भावना कळतच नाही. आयुष्य स्वतःच्या हातात आहे आपल्याला जस बनवायचं आपण तस बनवू शकतो, आणि जर वैष्णविला खरच जर कोणता मुलगा आवडत असेल तर त्यात चुकी काय आहे."
रेखा ने हळुवार नजर वैष्णवीकडे फिरवली.
वैष्णवी:"ताई तू पण, आणि मला खरच नाही वाटत की आपलं आयुष्य आपल्या हातात आहे, सगळ्या गोष्टी आपल्या आसपास च वातावरण ठरवतं आणि आपण त्यानुसार समोर जातो, जे की पाहील तर आपण काहीच करतचनाही आहो."
अचानक सर्व शांत झाले समोर पडलेली लाल साडी कडे त्याचं लक्ष गेल. ती साडी वैष्णविणे उचलून बाजूला ठेवली.
__________
लग्नाचा दिवस होता, लाल साडीत वैष्णवी आरश्यासमोर बसून होती. तिच्या आईने तिला काजळ लावलं,"तुझ्या मैत्रिणी नाही दिसल्या कोणी?" सुलोचनाने विचारलं.
वैष्णविणे आरशातून तिच्या आई कडे पाहिलं. "काय सांगू त्यांना?"
यावर तिची आई काहीच बोलली नाही. तिने फक्त तिला मागून मिठी मारली.
_______
किती ही वाईट वेळ आली तरी माझी आई नेहमी हेच म्हणायची की "सगळ ठीक होईल.", होईल बरोबर." असे शब्द पाठच होते.
एकदा मी खूप बिमार होतो, आणि रात्र झाली होती. आईने मला मांडीवर घेऊन हेच शब्द सांगितले "होईल सगळ बरोबर, झोप बाळा सकाळी दवाखान्यात जाऊ, मी आहे ना इथे." मी इतक ही लहान नव्हतो समजायला की मला कळणार नाही की माझी आई रडत आहे. त्या दिवशी खूप इच्छा झाली की श्वास घ्यायला सर्दीमुळे त्रास होत होता तरी डोळे बंद करावं आणि खरच झोपाव ज्यामुळे आईच रडण थांबेल. पण झोप मला आली नाही माझं कुणकुण करण काही थांबलं नाही.
तसाच मी आज कुणकुणत होतो.
लग्न मंडपात जाण्याची तयारी चालू होती. माझे आजोबा, आई आणि बाबा सगळे खुशच होते. मी एकट्या आईला म्हटलं.
"आई माझ मन नाही होत आहे."
त्यावर आईने माझ्या डोक्यावरून हात फिरवला, आई जी माझ्या आता खांद्या इतकी होती तिने डोक्यावरून हात खांद्यावरून माझा कुर्ता बरोबर केला आणि म्हणाली.
"जास्त विचार नको, सगळ्यांना लग्नाआधी असच वाटत, होईल सगळ बरोबर."
त्यावर आईने माझ्या डोक्यावरून हात फिरवला, आई जी माझ्या आता खांद्या इतकी होती तिने डोक्यावरून हात खांद्यावरून माझा कुर्ता बरोबर केला आणि म्हणाली.
"जास्त विचार नको, सगळ्यांना लग्नाआधी असच वाटत, होईल सगळ बरोबर."
मी फक्त हसलो, आई ही खूप खुश होती.
भाग 11
घरी येऊन 1 हफ्ता ही नव्हता झाला की लग्न ही झालं, लग्नानंतरचे कार्यक्रम, पूजा सगळी उरकून गेली. वैष्णवी काही बोलली नव्हती, तिच्या घरी ही सगळ्यांची मर्जी होती अस वाटलं नाही. आणि मग तो दिवस आला जेव्हा आजोबांनी मला कॉलेज ला जायची परवानगी दिली. कोणी म्हणायच्या आधीच वैष्णविणे ही तिची तयारी केली आणि बाहेर उभी होती.
माझे आजोबा घरात बसूनच होते. त्यांनी माझ्याकडे नजर केली, मी चुपचाप काहीच बोललो नाही. आईने इशारा केला आणि मी ही बाहेर निघालो.
5-6 तासाच्या प्रवासानंतर आम्ही माझ्या रूम वर आलो. डीजे रूम नव्हता माझ्या जवळच्या चावी ने आत येताच वैष्णवी पहिल्यांदा बोलली.
"मी इथे थांबणार नाही." मी पायातला बूट काढत होतो, मी तिच्याकडे वर पाहिले. ती आपली बॅग घट्ट पकडून होती, जशी की तिला माझी भीती होती. मी काहीच बोललो नाही आणि आत चाललो आलो. ती माझ्या मागे धावत आलीं.
"मी इथे राहू शकत नाही, हे सगळ असं आहे की मी माझ्या कोणत्याच मित्र मैत्रिणींना हे सांगू शकणार नाही, वरून मी तुला म्हटल होत .." ती पुढे बोलायच्या आधी मी तोंडासमोर हात केला. आणि ती थांबली.
"तुझी मर्जी मी त्यात काही बोलणार नाही, आपण नात्याने जरी जोडलेले असलो तरी सत्य आपल्याला माहीत आहे, बोलायची गरज नाही. आईने तुझं काही सामान माझ्या बॅग मधे टाकलं ते पाहून घेशिल. " मी म्हणत माझ्या बेडवर बसलो.
वैष्णवी: "हो, आणि माझ्या घरच्यांनी ही शेंगदाण्याच्या लाडू दिले आहे, मला गोड एवढ आवडत नाही मी नाही म्हटल पण तुझ्या आईने सांगितलं होत म्हणे काकूला की तुला गोड आवडत म्हणून."
मी:"बर तू फ्रेश हो, मी नेऊन सोडतो तुला."
वैष्णविणे तिचा सगळा पसारा वारला. आणि मग बाथरूम मधून फ्रेश होऊन आली. तिचे काळे केस मोकळे होते, ती कंगव्याने केस विचरत होती. पहिल्यांदा मी इतक्या जवळून आणि ते ही मोकळ्या केसात तिला पाहत होतो. मला सुचत नव्हतं काय करावं नाही माझ्या मनात तिच्या बद्दल काही भावना नव्हत्या, ती सुंदर आहे का ?–हो. ती आता सुंदर दिसत आहे का? तसा शेंदरी रंग मला पिवळ्या रंगाइतका आवडत नव्हता, पण तिचा रंगच असा होता एकदम सोन्यासारखा, आणि त्यात शरीर म्हणजे एक आकृती. पण तिच्याबद्दल काही मला वाटत होत का? –नाही. आम्ही दोघे एकाच नावीमध्ये बसून होतो, पण आम्ही जबरदस्ती बसवल्या गेलो होतो. आणि मला काही खात्री नव्हती की ती कधी उडी मारून काठ पकडेल किंवा दुसरी नाव पकडेल. मी विचारात होतो तेव्हा तिने माझ्याकडे पाहिले. माझी नजर तिला मिळाली आणि मी लगेच इकडे तिकडे मान फिरवली. मला काही सुचलं नाही, मी काही क्षणातच नजर तीच्याकडे केले. आणि तेव्हाच तिचे ते बोलके डोळे माझ्याकडे वळले, जस की विचारत आहे की माझं काय चालू आहे.
"कधी आला..."
डीजे माझ्या जवळ येऊन उभा होता, आणि बोलता बोलता शांत झाला. वेळ न वाया घालता त्याने नजर माझ्याकडे केली आणि हळूच विचारलं "ही इथे कशी?". मी त्यावर कांधे हलके सोडले. त्याच्या मनात लाखो विचार जसे एक साथ चालू होते. मी त्याला इशारा केला चूप रहा म्हणून.
"तू घरून आला आणि ही इथे मला एक क्षणासाठी वाटलं की तुझं हिच्याच सोबत झालं"तो हसतच बोलला पण लगेच त्याने वैष्णवी कडे पाहिले. आवाज अचानक वाढला.
"नाही बे, हे कसं काय?" तो एकदम स्तब्ध होता.
मी फक्त मान हो मधे फिरवली.
"खरच मला भरोसा नाही होत आहे, मले वाटलं की तू लग्न करशीन पण ते ही.." पुढे बोलतच होता तेव्हा त्याची नजर वैष्णवी वर गेली, जी ही थोडी स्तब्ध होती आणि तिला पाहून चूप झाला.
"हॅलो! वहिनी, मी दिनेश जोगदंड ऊर्फ डिजे,मी साहिलचा रूमपार्टनर, टेन्शन नका घेऊ उद्याच खोली खाली करतो. आज येणार आहे माहित असत तर आधीच केली असती." डीजे ने सरळ समोर जाऊन ओळख करून दिली, त्यावर वैष्णविणे सरळ माझ्याकडे पाहिले.
मी लगेच स्पष्टीकरण दिल: "त्याला मी सांगितलं होत, की लग्न ठरलं आहे पण कोणासोबत हे मला ही माहित नव्हतं तेव्हा."
डीजे:"वहिनी,तुम्ही टेन्शन नका घेऊ, तुमच्या मैत्रिणी आहेत त्यांना तुमच्या कडूनच ही बातमी मिळावी, तर मग.." ओठ सील करण्याचा इशारा केला.
वैष्णवीने काहीच उत्तर दिलं नाही फक्त मान हलवली, जस की कधी इथून बाहेर निघेल आणि कधी नाही आणि माझ्याकडे वळली."चलु या!"
ती पुढे गेल्यावर डीजेने मला विचारल . "कुठे?"
मी काहीच उत्तर दिल नाही आणि बाहेर आलो.
मी:"वैष्णवी, डीजेचा विचार करण्याची काही गोष्ट नाही, तो कोणाला सांगणार नाही."
वैष्णवी गाडीवर माझ्या मागे बसून होती, काही तरी बोलाव म्हणजे मी बोललो त्यावर तिने फक्त ठीक आहे अस उत्तर दिल.
तिचा रूम पासून दूरच मला थांबायला लावल, आणि तिथूनच वापस पाठवलं.
वैष्णविणे जस गेट उघडल, तिच्या समोर तिची वयस्कर घरमालकिन तिच्या कडे बघून हसत होती. त्यांचं नाव रमाबाई साळवे होतं त्यांना नेहमी साळवे काकू म्हणायची ज्यांची मुलगी राधा जी वैष्णवीच्या कॉलेज वर शिक्षिका होती.
"वैष्णवी, मला वाटलं तू आता येणार नाही परत." साळवे काकू हसतच म्हणल्या.
वैष्णवी तिच्या बॅगा आत ओढत ओढता हसली.
साळवे काकू :"का गं? तुझ्या घरच्या माणसाला का नाही सांगितलं हे नेऊन द्यायला." वैष्णवी चे डोळे एकदम मोठे झाले. ती स्तब्ध झाली. मान खाली करून म्हणाली.
वैष्णवी:"काय?"
साळवे काकू:"हो का? जस काही मला माहीतच नाही, बर झालं आज सकाळी तुझ्या बाबांना फोन लावला होता इतके दिवस कुठे होती तर तू, त्यांनी सांगितलं की लग्न ठरलं म्हणून. तू बोलवणार आहे की नाही, लग्नाला?"
वैष्णवी एकदम स्तब्ध झाली, तिच्या एवढ लक्षात आलं घरच्यांना घाई घाई मधे लग्न झालं हे सांगण्याच थोड चुकीच वाटेल म्हणून ठरलं एवढंच सांगितल असणार, पण सांगायचं गरजच काय होती. ती तशी ही राधा मॅडमला खूप मानत होती.
वैष्णविणे स्वतःला सांभाळले विचार करून बोलली. "सगळ कसं घाई घाईत झालं म्हणून , तुम्हाला सांगत होतीच, मॅडमला ही राग आला असेल."
साळवे काकू: "नाही ती यशला घेऊन दवाखान्यात गेली.बोलणंच नाही झालं."
वैष्णवी अचानक चिंतीत झाली :"काकू काय झालं यश ला? सगळ ठीक आहे ना."
साळवे काकू:"काही नाही, असच डॉक्टर कडे मुंबई ला जात असते. म्हणून सांगण झालं नाही, उद्या सकाळी कॉलेज मधे येईल तू तुझ्या हातानेच सांगजो, माझ्याकडून कळलं तर राग येईल."
राधा मॅडम त्यांच्या डिपार्टमेंट रूम मध्ये बसून होत्या. समोर वैष्णवी उभी होती. वैष्णविणे सगळी गोष्ट राधा मॅडमला सांगून दिली. ज्यामुळे त्या एकदम शांत झाल्या होत्या.
"अस कस होऊ शकते पण लग्न?" राधा मॅडमच्या चेहऱ्यावर घृणा होती. वैष्णवी ही काही बोलली नाही.
राधा :"वैष्णवी, तू आधीच लग्नासाठी नाही म्हणा लागत होत किंवा काय होतंय ते तरी मला सांगायला पाहिजे होत ना. काही तरी मार्ग काढलाच असता."
वैष्णवी:"कसा मॅडम? घरच्यांच्या विरोधात जाण्याची माझी हिंमत नाही."
राधा:"मग का आयुष्य बरबाद करशील का स्वतःच? मला काळजी आहे तुझी, तू विरोध केला असता, सुरवातीला दिल्या असत्या शिव्या, पण वेळेनुसार त्यांना कळाल असतच ना की तू तुझ्या आयुष्याच सोन करत आहे."
वैष्णविला राधाचे प्रत्येक शब्द बोचत होते. राधा मॅडम बरोबर होत्या पण वैष्णवी साठी ही काही सोप नव्हत. तिच्या घरून ही तिला कोणीच साथ दिली नाही ती राधा वर काय अधिकार म्हणून मदत मागेल. तिच्यात स्वाभिमान होता, पण तो स्वाभिमान तिच्या घरच्यांना दिसला नाही, तिने जे स्वप्न बघितले त्यात हे सगळ नव्हते हे तिला राधाला पाहून आठवत होते. कारण तीच अशी व्यक्ती होती जिच्या समोर ती आपलं मन मोकळं करत होत.
राधा बोलत होती पण वैष्णविणे बोलण्यासाठी ओठ उघडत नव्हते,तिचा कंठ एकदम दाटून आला,ती जशी जशी बोलायचा विचार करत होती तसं तिच्या डोळ्यात पाणी भरून आल, राधाला ला काहीच सुचलं नाही, ति विसरली होती की वैष्णवी तिच्या लहान बहिणी सारखी आहे फक्त एक विद्यार्थी नाही. राधाने उठून तिला गळा लावला. लहान लेकरा प्रमाणे वैष्णवीचा कंठ फुटला आणि ती एकदम रडायला लागली.
वैष्णविला आता श्वास आवरत नव्हता, मॅडमने तिला धरून ठेवलं. आणि तिच्या डोक्यावरून हळूच हात फिरवला आणि डोळे पुसले.
राधा:"तुला काय वाटत मला समजत नाही आहे? मी जेव्हा यश च्या वाडीला सोबत घटस्फोट घेतला तेव्हा ही खूप जण माझ्या विरोधात होते आई ही होती, त्याच्या साठी मला ही काही पश्चात्ताप आहे, पण तरीही मी तो निर्णय घेतला. तू काळजी नको करू? काही तरी मार्ग निघेलच यातून."
वैष्णवी ही थोडी शांत झाली.
वैष्णवीचे डोळे खालीच होते, हळू हळू नजर वर करत ती म्हणाली : "मॅडम मी कोणालाच अजून हे सांगितलं नाही, काकूला फक्त लग्न ठरलंय हे सांगितलं, आणि मला नाही वाटत दुसऱ्या कोणाला काही माहित व्हावं."
राधाने हो मधे मान हलवून : " त्याच टेन्शन नको घेऊ, आई काही कोणाला सांगणार नाही ती वरती तुमच्या रूम वर जात नाही तशी ही. पण मग राहायचं कसं मला अजून कळलं नाही?"
वैष्णवी: "मी सरळ म्हटल की आपण आपल्या जागीच राहू, पुढचा काही मी अजून विचार केला नाही. माझ कॉलेज होई पर्यंत तरी घरच्यांचा म्हणण्या नुसार काम करावं लागेल."
राधा :"काही लागलं तर सांगजो, तसा ओळखीचा आहे का मुलगा तुझ्या."
वैष्णवी:" आपल्याच कॉलेज मधला आहे, साहिल राठोड."
______
"खरच पण मुलीच्या भरवश्यावर राहायला नाही पुरत बर?" डीजे म्हणाला, आता गोष्ट कुठून निघाली काय माहित. आम्ही कधी माझ्या वरून तिथे आलो दोघांना ही माहित नाही.
मी: "जाण बे! खरच तू कधी कधी बोलाच म्हणून, काही ही बोलत."
डीजे:"खरच, तू आपल्याच फील्ड मध्ये पाहणा, किती मुली IIT त आहेत?."
मी डोक्यावर हात ठेवला, आमच्या जवळून जाणाऱ्या मुलींनी ही तोंड वाकड केलं.आता समजल मुद्दा काय होता, मुद्दा वैष्णवी बद्दल होता की ती किती हुशार आहे. त्यावर आमच बोलणं चालू होत. पण त्यानंतर आम्ही खूप वेळ पासून काही तरी वेगळ्याच गोष्टीवर बोलत होतो.
मी:"तुझं म्हणणं काय आहे? अजून ही समजलच नाही? काय वकत आहे तुला तरी माहित आहे ना."
समोरून मॅडम आली, लगेच बेंच वरचा पाय डीजे ने खाली केला. आणि जोरात आवाज करून बोलला.
डिजे:" अरे मी मुलींच्याच बाजूने आहे, पाहणं आजकाल पोरी आजकाल कोणाच्या भरवश्यावर नसते आणि म्हणून आपण ही नाही राहाचं. आता मुलीला सक्सेसफुल होण्यासाठी IIT ची गरज आहे का? बिना IIT च्या ही खूप मुली सक्सेसफुल आहेत."
आणि अचानक थांबून थोडा विचार करत पुढे बोलला, मॅडम आमच्याकडेच पाहत होती.
डिजे:"स्मृती मन्धना, हरमप्रीत कौर , करणजीत कौर आणखीन विदेशात तर लयच आहे." पुढे बोलणार होता तेवढ्यात मॅडम ने डोळे दाखवून चूप केले.
पूर्ण लेक्चर मॅडम आमच्याकडेच पाहत होती. मॅडम जशी गेली डिजे एकदम खुश होता.
डीजे:"मॅडम लेका, किती पाहत होती माझ्याकडे. मी स्वतःला कस सांभाळलं ते मलाच माहित."
खरच पण मॅडम का पाहत होती हे थोड विचित्रच होत.
लाईक करा आणि आपले विचार मांडा, स्टोरी सुरू ठेवायची असेल तर प्रतिसाद द्या.
कॉलेज पार्क
"काय म्हणत आहे मॅडम?" गौरीने वैष्णविला विचारलं.
वैष्णवी:"काही नाही, इतके दिवस कुठे होती, घरी कसला कार्यक्रम होता."
गौरी:"खरच ना पण, किती दिवस घरी होती तू, म्हटल येतं आहे की नाही बा आता, कॉल वगेरे काहीच नाही उचलला."
वैष्णवीच लक्ष अचानक साहिल वर गेल तो डीजे सोबत हसत खेळत जोराने गोष्टी सांगत होता, जस काही घडलच नाही.
गौरी:"काय झालं तिकडे काय बघत आहे."
तेवढ्यात मागून अथर्व आला.
"कोणाकडे?" अथर्व म्हणाला.
वैष्णविणे मग लगेच नजर वळवली.
"काय? ते असच विचारात होती, क्लासेस चालू झाले असेल का?"
अथर्व:"नाही वेळ आहे मी विचारपूस केली."
वैष्णवी:"का?"
अथर्व: "नाही, म्हटल प्रयत्न कराव , काय सांगता येते? यात मन येऊन जाईल."
_____
"ते बघ, तुझी बायको आहे ना ते? तिच्यापाशी जाऊन तर उभा रहा." डिजे म्हणाला.
मी: "मी काय करू, ती तर या लग्नाला मानत सुद्धा नाही, लग्न फक्त नावाचं आहे तिच्यासाठी."
डीजे:"नावाचं म्हणजे काय असते, तिच्या घरच्यांसाठी तर तू जावई आहे, तुझ्या घरची ती सून आहे, आता संध्याकाळी तुझ्या भावाच्या रूम वर जायचं आहे तिथे एकटा गेला तर काय म्हणेल. हे काय आहे मलाच नाही समजल तुझ्या भावाला समजेल का?"
मी काहीच बोललो नाही, खूप वेळा अस व्हायचं की डीजे च माझ्या कडून गोष्टी करून घ्यायचा ज्याची माझी इच्छा असो की नसो, पण
त्यात चूक ही त्याची नव्हती. मीच थोडा आळशी आहों.
मी:"जाऊदे मला नाही बोलायचं त्या बद्दल, मी जॉब बघत आहो, प्रोजेक्ट पाठवले मी दोन तीन कंपनीला तुला वाटते त्यांना आवडेल."
डीजे:"ऑप्शन, फ्युचर आणि काय आहे ते तर, ते पुस्तक चालू केलं मी, वाचनचं नाही झालं फक्त. ते वाचल्यावर पाहीन प्रोजेक्ट, तस ही सांगू शकतो, पण माझा सल्ला नेहमी कशाच्या तरी आधारावरच असते."
मी:"लवड्याच्या!, जाऊदे मीच बघतो काय आहे तर, वैष्णवी ले सांगाव लागेल संध्याकाळच."
मी वैष्णवीच्या ग्रूप कडे निघालो. ते सर्व वैष्णवी जवळ गोळा होते. त्यासर्वांचे लक्ष अचानक माझ्याकडे झाले.
मी:"वैष्णवी."
वैष्णवी एकदम स्थिर झाली, कडकड तिने हाताची बोटे मोडली. जसा काही पूर्ण जोर बोटांमध्ये ठेवला असेल. ती अस्वस्थ होती हे समजायला काहीच वेळ लागला नाही.
"काय काम होत रे. हरामखोरा" श्रेयस म्हणाला. त्या दिवसाच्या भांडणाने तो तापून होता, हे तर या लग्नाचा भांडगडीत हे मी विसरलोच होतो.
मी:"काही नाही मला, वैष्णविशी काम आहे, एकट्यात्."
श्रेयस:"तुझी हिंमत कशी झाली..."
पुढे बोलेल त्याआधी मी बोललो.
मी:"जास्त बोलू नको, तू वैष्णवी आहे का?"
वैष्णवी:"श्रेयस, चूप बस बर, येतो 2 मिनिट."
एवढ बोलून ती ग्रूप या बाहेर निघाली.
"काय काम होत?" वैष्णवी जवळपास कंटाळा आल्यासारखी म्हणाली. मला जसा काही झटकाच बसला, मीच थोडी अपेक्षा जास्त ठेवली होती अस मला वाटलं.
मी नजर फिरवून बोललो "आज संध्याकाळी माझ्या दादा आणि वाहिनीच्या रूम वर बोलावल आपल्या दोघांना."
वैष्णवी: "बर,येईल मी."
इतकीच बोलली, त्यावर मी काही तरी बोलणार होतो पण का तर माझी इच्छाच राहिली नव्हती.
अथर्व, गौरी आणि बाकीचे वैष्णवीचे मित्र–मैत्रिणी वैष्णवीकडे पाहत उभे होते.
"मग कधी?" सार्थक अथर्वला डोळा मारत म्हणाला.
"त्याच दिवशी विचार होता पण श्रेयसच ते झाल." अथर्व बोलला.
सार्थक: "आज कर मग,मला नाही वाटत तुला नकार देईल म्हणून."
अथर्व: "नकार तर देणार नाही, पण काही तरी चांगल ठिकाण आणि वेळ पाहून तिला विचारील. तिच्या साठी ही हा एक विस्मरण्यीस क्षण असणार आहे तर त्यात काही कमी ठेवायला पुरत नाही."
गौरी: " पण काही दिवसापासून ती खूप चिंतेत दिसत आहे. घरी काही झालं असेल तर काय सांगाव."
गौरींच्या चेहऱ्यावर चिंता उमटली होती.
अथर्व:"तिला मी प्रपोज करणार आहे हे तर माहीत नसेल झालं ना?"
श्रेयस:" तिला शंका झाली असेल, तू प्रपोज नाही केलं ना म्हणून तिला वाटत असेल की तू करणार आहे की नाही प्रपोज की तुझं मन बदललं."
अथर्व गालातल्या गालात हसला.
_______
संध्याकाळचा वेळ झाला मी वैष्णवीची वाट रस्त्याच्या बाजूला बघत होतो. ती आली, पिवळसर लिंबू रंगाचा ड्रेस, त्यावर कोणत ही नक्षी काम नव्हत, एकदम प्लेन रंग. तिच्याकडे बघता बघता अचानक माझ्या ओठांवर आनंद आला. मगाशी राग आला होता, पण तो आता शांत झाला. तिने जवळ येताना तिच्या गोऱ्या चेहऱ्यावरून केसांची लट मागे सरकवली.
तीच जायचं मन नव्हतं हे मला माहितच होत, पण माझी ही काही इतकी जास्त इच्छा नव्हती. खुशी माझी पुतणी नसून मला स्वतःच्या जिवा पेक्षा लाडाची होती. पण त्याच बरोबर माझ आणि माझ्या भावाच काही चांगलं नातं नव्हतं. नेहमी माझ्या राहणी मनात, बोलण्यात आणि स्वभावात चुकच काढायचा. आईच्या म्हणण्या नुसार ते फक्त काळजी होती माझ्या भावाची.
आम्ही माझ्या भावांच्या तिथे पोहोचलो. तिथे दरवाजा उघडल्याबरोबर वाहिनी साडी घालून होती. त्यांची नजर सरळ वैष्णवीच्या ड्रेस वर गेली, ड्रेस वरून लगेच त्यांनी दादा कडे पाहिले.
माझ्या भावाच्या डोळ्यात कोणताच भाव नव्हता, फक्त अभावाने हसला आणि वहिनीने आम्हा दोघांना आत बोलावलं.
मला काही वेळ समजलच नाही, पण वैष्णवीचा चेहरा अचानक उतरलेला पाहून लक्षात आलं की काय झालं. का तर पण माहित नाही पण त्यांना अपेक्षित होत की वैष्णवीने साडी घालून यावी, दादासोबत काही बोलण झालं असेल कपड्यांबद्दल म्हणून शकते असा माझा अंदाज होता.
तेवढ्यात खुशी काका ,काका ओरडत माझ्या जवळ आली.
वैष्णवी वहिनीला हातभार लावू लागत होती, मी दादा सोबत बाहेर बाल्कनीत बसून होतो. खूप वेळ बाल्कनीत शांतता होती.
"तुला सांगाव की नाही माहित नाही पण, हिचा भाऊ .. काय नाव आहे तर अर्पित काही महिने झाले आमच्याच कंपनीत काम करतो, मला एवढ्यातच माहीत झालं." दादा बोलला.
मी फक्त मान डोलावली, अर्पित तसाही माझ्याशी काही बोलला नाही. खुशी एकटी खेळण्यासोबत खेळत होती.
"जॉबच काय झालं मग?" पुन्हा दादाच बोलला. मला समजलं नाही काय बोलाव तर पण मी डिजे सोडून कोणाला सांगितलं नव्हतं की जॉब शोधत आहों म्हणून.
"तुला कस माहित... राहूदे विचाराला नाही पुरत." एवढ बोलून मी उभ झालो.
मयूर दादा :"खरच! अस आहे का? आईले सांगायला जमते, लहान लेकरासारख, पण मोठ्या भावाले नाही. आई मले कल्ला करे मी काही म्हटल का म्हणे जॉब बघत आहे तू तर."
"तुला कस माहित... राहूदे विचाराला नाही पुरत." एवढ बोलून मी उभ झालो.
मयूर दादा :"खरच! अस आहे का? आईला सांगायला जमते लहान लेकरासारख, पण मोठ्या भावाला नाही. आई मला कल्ला करे मी काही म्हटल का म्हणे जॉब बघत आहे तू तर."
मी काही वेळ शांत झालो. मयूर दादा पुन्हा बोलला:"अभ्यास करायच जीवावर आल का, की काम बघत आहे."
मी पुढच काहीच ऐकलं नाही आणि तिथून आत मधे आलो.
जेवण झाल्यावर जाणारच होतो.
"क्काका."जोराने ओरडत खुशीने माझा पाय घट्ट धरला. लहान मूल इतक्या जोराने कशी काय ओरडू शकतात. मी तिच्या डोक्यावरून हात फिरवून.
मी: " रात्रीच भेव लागण ना तुला. उद्या येईल ना बई."
खुशी आता रडत होती : "मम्मी तांब मनाना क्काका ले."
वहिनी :"काकांच कॉलेज आहे ना बाई, आपण जाऊना त्याच्या रूम."
खुशी :"तू मनतच तक्त."
वहिनीने माझ्याकडे पाहिले. : "राहून जा ना मग भाऊजी." आणि आवाज एकदम हळू करून "उद्या सकाळी मग...." इतकी म्हणाली. खुशीने ऐकलं नाही की मी उद्या सकाळी चालला जाईल.
वैष्णविणे फक्त माझ्याकडे पाहिलं आणि काहीच बोलली नाही.
काही वेळानंतर हॉल मध्ये खुशी वैष्णवी आणि मीच होतो. वैष्णवी तशी काही जास्त बोलत नव्हती. पण तिच्या चेहऱ्यावर नेहमी हसू राहायचाच आणि लहान मुलांपेक्षा कोण जास्त हसवू शकत माणसाला. खुशी मग तिचे खेळणे वैष्णविला दाखवत होती. तिच्यासाठी तर ती तिची काकू होती. खुशीचा खेळ चालू होताच.
वैष्णवी तिच्या बाहुलीच्या वेण्यांसोबत खेळत खेळता बोलली: "साहिल, तसा माझा विचारण्याचा काही अधिकार नाही पण तुझी वहिनी म्हणत होती की तू जॉब शोधत आहे, आणि त्यांना वाटते की लग्न झाल म्हणून बघत असेल. आणि मला माहीत असेल अस ही त्यांना वाटत, पण मी काहीच बोलली नाही."
मी : "नाही अस काही नाही, लग्न झालं हे कारण आहे पण त्यात तुझं काही आहे अस नाही, मी जॉब माझ्यासाठीच करत आहे. लग्न झाल्यावर घरचे पैसे द्यायला मागे पुढे करणारच आहे म्हणून आधीच थोड सावधान."
वैष्णवीचे हात अचानक बाहुलीच्या केसांवर थांबले. तिने एकवेळ खुशी कडे पाहिले. खुशी एकटीच काही तरी बडबड करत खेळत होती आणि माझ्या हातात एक एक वस्तू देत होती. वैष्णवीची नजर बाहुलीवर होती, खाली बघत ती शांत स्वरात.
वैष्णवी :"माझ्या घरी ही थोडी तशीच परिस्थिती आहे." काही वेळ विराम घेऊन पुन्हा बोलली."मला सुद्धा जॉब बघावा लागेल, मला सुद्धा आता मागता येणार नाही."
मी फक्त तीच्याकडे पाहील, मी तिची जबाबदारी घ्यायला पाहिजे होती, पण माझी हिंमत नाही झाली ते म्हणायची.आमच लग्न झालं, घाईत झालं आणि जवळपास सगळेच लग्न आमच्यासारखीच होतात मग आमच्यात का इतका दुरावा आहे हे मला समजलं नाही.
मी :"तुला झोपायच असेल तर झोप, खुशी लवकर झोपणार नाही."
आम्ही एकाच खोलीत झोपलो. दोघांच्या मधात फक्त खुशी झोपून होती. सकाळी उठल्यावर खुशी माझ्या हातांवर डोक ठेवून झोपून होती. इतक घट्ट जस की तिला माहित होत की सकाळी तिला न उठवता मी जाणार. सुटून काही वेळाने मी आणि वैष्णवी खाली उभ होतो.
गाडीवर बसल्या बरोबर वैष्णवी बोलली.
वैष्णवी: "मी साडी घालायला पाहिजे होती का?"
मी तिचा प्रश्न ऐकून गाडीच्या आरशातून तिच्या कडे पाहिले. ती आता तिसऱ्यांदा माझ्या गाडी वर बसली होती. पण त्या गोष्टीची सवय मला झालेली नव्हती. ती बोलल्यावर पाठीवरून वारा गेला अस वाटलं. मी एकदम विचारात गोठून गेलो.
वैष्णवी:"तुझी वहिनी आणि दादा जसे माझ्याकडे बघतं होते त्यावरून वाटलं की त्यांना माझा ड्रेस घालणं आवडलं नाही."
मी: "असू शकते, पण मला नाही वाटत की तूझ्या बद्दल काही वाटलं त्यांनाहोत उलट दादांनी काही वाहिनीला ड्रेस साठी म्हटल असेल म्हणून वहिनी तशा बघत होत्या."
वैष्णवी:" पण तरी अर्थ बदलला नाही ना, पुढच्या वेळेस पासून लक्ष ठेवावं लागेल."
मी: "असू शकते, पण मला नाही वाटत की तूज्याबद्दल काही वाटलं त्यांना, उलट दादांनी वाहिनीला ड्रेस साठी म्हटल असेल आधी म्हणून वहिनी तशा बघत होत्या."
वैष्णवी:" पण तरी अर्थ बदलत नाही ना, पुढच्या वेळेस पासून लक्ष ठेवावं लागेल."
____________
भाग 16
वैष्णवी जशी तिच्या खोलीत आली, गौरी आरश्या समोर बसून वेणी घालत होती. वैष्णविच लक्ष खाली केलेल्या पसाऱ्यावर गेल, गौरी घाईत असावी कॉलेज मधे जाण्यासाठी कळायला वेळ नाही लागला.
"रात्रभर वाट पाहली? कोण्या पोराला भेटायला गेली होती?" गौरीने विचारलं.
वैष्णवी काहीच बोलली नाही, जास्त बोलली तर अर्थ वेगळा निघेल म्हणून कपडे घेऊन बाथरूम मध्ये घुसली.
"लवकर कर." गौरी खोलीतून ओरडली."आपल्याला आधीच उशिर झाला."
_________
कॅन्टीन मधे गौरीच्या हसण्याच्या आवाज जोरात घुमत होता. अथर्व ही सार्थकच्या गोष्टीवर हसला. सार्थकने फक्त मान फिरवली.
सार्थक:"मग काल रात्री कुठे गेली होती ती?"
गौरी स्वतःच हसन सांभाळत : "मी सांगितलं ना, तिच्या नातेवाईकांच्या घरी होती, आणि मला कळाल नसत का काही? जर तीच असत तर."
सार्थक:"नाही मी फक्त म्हणत होतो, ती इतकी सुंदर आहे की तिचा बॉयफ्रेंड नसणं अशक्यच वाटते. वरून राहते ही बॉस सारखी तर कोणी विचारू ही शकत नाही, तर मग कसं समजाव ती सिंगल आहे की नाही."
गौरी: "ती काही बॉस सारखी नाही, फक्त अभिमानी आहे, म्हणूनच कोणाच्या मागे लागेल हे शक्यच नाही."
अथर्व:"हो, आणि मी तिचा बेस्टफ्रेंड आहो, मला कळालच असत काही आहे म्हणून."
सार्थक ने यावर गौरीकडे पहिल, जिने डोळे वरती फिरवले.
सार्थक: "बर जाऊदे गौरी तुला काय वाटते , अथर्वला हो म्हणेल."
गौरी आणि सार्थक दोघांची नजर अथर्व वर होती जो की गालातल्या गालात हसत होता.
गौरी: "म्हणजे.." एवढ बोलून तिने अथर्व कडे पाहिल आणि विचार केला "होच म्हणेल अथर्व सोडून आहेच कोण... तिच्या लायकीच. आणि तिचं मुलांमध्ये अथर्व शिवाय कोणासोबत पटत ही नाही."
अथर्व गालातल्या गालात हसत होता आणि सार्थकने फक्त मान डुलावली.
अथर्व: "बाहेर आली नाही वाटते वैष्णवी?"
गौरी: "नाही अभ्यास आहे, म्हणून लायब्ररीत आहे. इतकी दिवस घरी होती ना."
सार्थक: "गौरी, मग घेणार आहे का तू स्कूटी?"
गौरी: "घ्या तरी लागेलच, पण सध्या आहे ना वैष्णवीची, आणि तशी ही ती वापरत नाही जास्त, कालच बिना स्कुटीची बाहेर गेली."
अथर्व: " बर आहे, वैष्णवी तुला बरी चालवू देते तिची गाडी आम्हाला तर हात ही लावू देत नाही."
गौरी: "तिच्या समोर तर मला ही चालवू देत नाही, ती नसली की मग तिला फरक नाही पडत."
अथर्व हसत: "चांगल आहे मग तुझ्यासाठी."
गौरी: "चांगलच असणार आहे"
हसता हसता गौरीने नजर मग सार्थक कडे केली.
गौरी: "स्नेहा काय म्हणते मग?"
सार्थक ने डोक वर केलं आणि मोठा श्वास घेतला: "मी तुम्हाला सांगणारच होतो,बर झालं आठवल.. जय थोडा जास्तच स्नेहाच्या जवळ वाटत नाही का?"
अथर्व:"हो मला ही जाणवलं."
गौरी ने हात समोर केला: "काही पण, आपण सगळे मित्र मैत्रिणी आहोत सगळेच, जवळ आहो एकमेकांच्या, एवढ्याश्या गोष्टी साठी."
सार्थक: "हो, आपण मित्र मैत्रीण आहों, काही मर्यादा आहे ना आपल्याला , खेटून नाही बसत ना त्यांच्या सारखे" बोलता बोलता सार्थकचा आवाज वाढला. गौरीला ही ऐकून भरवसा होत नव्हता आणि सगळ्याच्या वळत्या माना बघून सार्थकने आवाज कमी केला.
सार्थक हळू आवाजात : "अथर्व, खर नाही का?"
अथर्व: "नाही, सार्थक खरा बोलत आहे, मी ही खूप जवळ जवळ बसतांना पाहील त्यांना."
गौरी:"तू मग याबद्दल स्नेहाला का नाही सांगितलं."
सार्थक: "म्हटल मी पण तिला राग आला, म्हणे माझा तिच्यावर भरवसा नाही."
गौरी:"मी पाहतो समजावून, ... तुमचं एवढ्याश्या गोष्टी साठी तुटलं नाही पाहिजे."
सार्थक: "म्हटल मी पण तिला राग आला, म्हणे माझा तिच्यावर भरवसा नाही."
गौरी:"मी पाहतो समजावून, ... तुमचं एवढ्याश्या गोष्टी साठी तुटलं नाही पाहिजे."
भाग 17
स्नेहा, वैष्णवी सोबत लायब्ररीत बसून होती. वैष्णवी जी अभ्यास करण्यासाठी आली होती. पण स्नेहा ही तिथे येऊन तिच्या आणि सार्थकच्या मधात होणाऱ्या गोष्टी सांगत होती.
"प्रेमात असल्याने काय माणसाने आपलं आयुष्य गहाण टाकून द्यायचं असत का?" वैष्णविणे स्नेहाच्या गोष्टीवर फक्त मान हलवली.
स्नेहा:"आता जय आपला मित्र आहे, तो माझ्या जवळ येऊन बसला त्यात माझी काय चूक?"
वैष्णवी:"हो पण तू समजावून पाहील का सार्थकला? मला वाटते तो समजेल काय झालं सांगशील तर."
स्नेहा:"मी सांगितलं तो ऐकायला तयार नाही तो म्हणतो की मी हेच जय ला का नाही सांगितलं ? त्याच्या कानाखाली का नाही दिली? "
वैष्णवी काही बोलली नाही.तिला समजलच नाही काय बोलाव.
स्नेहा: "मी कंटाळली, नेहमीचच झालं त्याच? हे नको करू ते नको करू, सगळ्या गोष्टीत त्याच्याच विचार कराव लागतो."
वैष्णवी: "हो पण मग, तूच तर म्हणते की प्रेमा पुढे काहीच नाही मग इथे काय झालं."
स्नेहा: "हो, आपल्याला वाटते की आपण प्रेमासाठी काही ही करू शकतो, पण आपण ही माणूस आहों, परफेक्ट जशी अपेक्षा आहे तसं प्रेम करणं शक्य थोडी आहे."
वैष्णवी: "हे बघ, आता मी काय सांगू शकतो. तुला जे बरोबर वाटते ते कर..."
स्नेहा:"तुझं ही बरोबर आहे, काही ही ठरवलं तरी पश्चात्ताप होणारच आहे. "
वैष्णवी: "नाही ग सगळ ठीक होईल."
स्नेहा:"असच चालू राहल तर पश्चात्ताप होणार नाही का? सोडून का नाही दिलं वेळ होती तेव्हाच."
वैष्णवी: "तू पण ना..." वैष्णवी पुढे बोलणार होती तेवढ्यात तिला कॉल आला.
तिने पाहील, फोन मॅडमचा होता.
"हॅलो मॅडम, काय झालं? आज लेक्चर नाही तुमचं?"
तिकडून, "तू घरी आली का?" त्यांच्या आवाजात चिंता होती.
वैष्णवी: "काही झालं का? नाही कॉलेज मधेच आहों."
राधा मॅडम: "मी यश च्या शाळेत आहों, त्याला आज दवाखान्यात न्यायचं होत , पण तो शाळेतच नाही आहे." मॅडम एका श्वासात बोलली.
वैष्णवी:"शाळेत नाही आहे म्हणजे.?.."
राधा मॅडम: "मी मॅडम सोबत बोलली, तो आज आलाच नाही म्हणल्या."
वैष्णवी: "तुम्ही टेन्शन नका घेऊ.. असेल तो घरीच, मी जाऊन बघते."