If you are trying to reset your account password then don't forget to check spam folder in your mailbox. Also Mark it as "not spam" or you won't be able to click on the link.
"माणूस मादरचोद असला तरी चालन, पण तो छक्का नसला पाहिजे." हे शब्द माझ्या परम मित्र DJ भाऊंचे, त्याची वाणी अशी होती की जेव्हाही तो काही बोलला तर आस पासचे लोक फक्त आपल्या कडे बघतात. मला तर एक माणूस ओळख ना पाळख रस्त्यावरच म्हणाला की हा तर दिसतोच नीच पण तुला तरी थोडी लाज नाही का? त्यात त्याची ही चूक नाही डिजे ऊर्फ दिनेश जोगदंड भाऊंनीच त्यांना थांबवुन आपल अमूल्य न्यान देणं चालू केलं पण जाऊद्या तो विषय वेगळा.
मी सध्या वर्गात इकडे तिकडे पाहत होतो कोणी ऐकल तर नसेल ना.
"थोड माणुसकीत बोलत जाय? मी काय म्हणत आहों आणि तू काय?" मी हळू आवाजात बोललो मागच्या बेंचवर मुली होत्या त्यांनी पूर्ण शब्द ऐकले का काय माहित पण त्या हसत होत्या, नुसत शिव्या ऐकल्या असाव्यात कारण गोष्ट ऐकली असती तर हसू तर नक्कीच आला नसता.
डीजे: "तुले कौन लागून राहिल, तू छक्का आहे का? अन मी बरोबरच बोललो ना, जर मुलीला तुझ्या सोबत फक्त सेफ वाटत असण तर थू आहे, मग कसा पटवशिन तिले."
मी: "का? माया टेक्निक मध्ये काय चुकी आहे? म्हणजे एकदम ठरकी वाटलो पाहिजे म्हणजे डायरेक्ट पोलिस ठाण्यात माणूस."
डिजे: "म्हणून तर तुया सारखे पोर फ्रेंड झोन होते, फ्लर्ट करण बिन गोष्ट असते, मुलींनले आवडते जर टेक्निक बरोबर असण तर."
" ‘तुम्ही मागून ही छान दिसता’ हे कोणती टेक्निक आहे तुझी?" मी हे बोलता बोलता हसलो.
डिजे पुढे काही न्यान देत असता त्या आधी वर्गात काही मूल मुली आले. सगळी मूल आप आपल्या ग्रूप सोबत जाऊन बसले. काही वेळात प्रेझेंटेशन होत. माझ्या ग्रूप मधल्या एका मुलीने तर एका पानावर लिहूनच आणलं होत की काय बोलायचं, एक तर सगळ मराठी त बोलणार हो,ता मी काही तरी तुटक तुटक पाठ केलं होत. पण अथर्व जो माझ्या ग्रूप मधे होता त्याने एकदम इंग्रजीत ताळ ताळ प्रेझेंटेशन दिलं. आम्ही नंतर जागेवर बसणार होतो तेव्हा जवळ जाऊन शुभेच्छा दिल्या, त्यावर त्याने फक्त नजर अशी करून माझ्या कडे पहिल जस की तो एखादा इंग्रज आणि मी नांगडा एक गरीब भारतीय.
अथर्व सारखं कोणी प्रेसेंट केलं असेल तर खूप कमी मूल होती. त्यात वैष्णवी एक होती, वैष्णवी जशी समोर आली वर्गातील सगळी एनर्जी तिच्याकडे स्थित झाली. वैष्णवी वर्गातील काय आमच्या विद्यापीठातील सगळ्यात फेमस मुलगी होती. त्याच कारण सोपी होत : मुलं. तशी तर आमच्या कॉलेज मधील सर्वात उच्च मुला मुलींमध्ये राहत होती त्यात अथर्व होता. अथर्वची चांगली मैत्रीण होती वैष्णवी पण अथर्व आणि तिच्यात एक फरक होता की वैष्णवी अभ्यासात तर हुशार होतीच पण तशी ही समजूतदार होती.
माझ्या सोबत बोलणं खूप कमी व्हायचं पण जेव्हा बोलायची तेव्हा अथर्व व त्याच्या मित्रासारखी खाली टाकून नाही बोलायची.
पार्किंग मध्ये मी डिजे सोबत उभ होतो.
डीजे: "सोड न ते, आपण काय करू शकतो, मॅडम आवडल बस झालं."
मी: "मॅडम ले कस काय आवडलं? समोर तर आवाज नाही निघाला तुया."
डिजे:" मॅडम म्हणे ना छान होत म्हणे."
मी: " पुढे काही म्हटल असण ना?"
डिजे: "हेच की ... जा न बे लवड्या, तू हसत जा माझ्यावर फक्त."
_________
"दिनेश खूपच विचित्र आहे तो? साक्षी ला काय खराब मेसेज केलते. मला वाटलं की वैभव सारखा गावठी असेल पण तो तर खूपच गेलेला आहे." वैष्णवी तिच्या मागे बसलेल्या गौरीची गोष्ट ऐकत होती.
वैष्णवी: "जाऊ दे, आपल्याला काय कराव लागते."
गौरी: "हो म्हणा, आज संध्याकाळी चालशीन ना मला काम होत बाहेर, आपली बाकीची गँग ही येत आहे."
वैष्णवी:" बाकी अथर्वला काय झालं, समजल का?"
गौरी: "काही नाही त्याचा ग्रुप थोडा ढिला आहे म्हणते तो."
________________
वहिनी!"
"सुलोचना वाहिनी"
सुलोचना जी पलंगावर झोपून होती, तिला अचानक आवाज आला. थोडस आवर उवार करेपर्यंत पुन्हा तिच्या नावाची हाक मारली. तिला आवाज कळाला की हा अनिल चा आहे, अनिल तिचा देर. सुलोचना बाहेर निघतच होती की, अनिल एकदम तिच्या खोलीच्या दरवाज्यापाशी उभा झाला.
"काय भाऊजी, इतक ओरडायला काय झालं तुम्हाला?" सुलोचनाने विचारलं.
"वहिनी दादा कुठ आहे?" अनिल आता मध्ये येत प्रश्न केला.
"काय माहित, बाजाराला जाणार होते. आता तुमचे दादा का मला सांगून जातात का?" सुलोचना बोलली.
अनिल: "वहिनी, ... दादाने होकार दिला."
"दादाने काय?,.... हो.. होकार समजल नाही" सुलोचनाला समजलच नाही अनिल ला काय म्हणायचं आहे तर पण अनिलच्या चेहरा पाहून तिला वेळ नाही लागला की काय गोष्ट घडून गेली. सुलोचनाने डोळे निराश झाले होते. तिला ज्या गोष्टीची भीती होती तेच झालं.
"का पण? मोठे भाऊजींनी तर समजावलं असेल ना." सुलोचना डोक्यावर हात ठेवून म्हणाली.
"श्यामरावच असेल? काही तरी बोलला असेल जेकी दादाला लागलं श्यामराव ला हे बरोबर जमत, वरून दादाला हेच वाटत की आई बाबाची इच्छा ही होती अशी."
"तो माणूस हरामखोर आहे, मेला कसा काय नाही, हार्ट अटॅक आलता तेव्हाच मरावं लागत होत मा.." सुलोचना रागात पुढे बोलता बोलता थांबली.
......लाईक करा, आणि आपले विचार मांडा पुढचा भाग लवकर येईल. फक्त प्रतिक्रिया मांडत रहा.
"क्लस आरामशीर सोडत जाय, अशी कशी शिक्शील तू गाडी?" टोमणे ऐकून ऐकून माणूस कंटाळून गेला, अस नाही की मी कधी गाडी चालवली नाही, त्या आधी मी चालवली होती गाडी, पण बाबा समोर पहिल्यांदा हाती घेतली होती. आणि त्यानंतर ही मी रोज रोज गाडी चालवून सुद्धा मनात भीती राहतेच की माझ्याच्याने काही तरी चुकेल. माझ्या कानात माझ्या वडिलांचे शब्द नेहमी असतातच
जे मला प्रत्येक वेळी आठवण करून देतात की मी चुकेल.
आता सध्या मी खोली वर आलोच की मला अशा प्रकारे घरच्यांची आठवण झाली. आत येताच मी आई ला फोन केला.
"हॅलो!"
"हॅलो, बोल काय म्हणत?" माझी आई जोरात फोन वर बोलली, तिचा आवाज जसा की पूर्ण गावात फिरला असेल.
"काही नाही आता कॉलेज वरून आलो म्हणुन केला होता." मी म्हणालो.
आई:"बरं केलं, मी लावतच होती फोन, जेवण झालं का?."
मी: "नाही, क्लास उशीरा सुटला आता मेस बंद झाली असेल."
आई:" काय फायदा मग त्या मेस चा?"
मी:" आता काय कराव?"
आई:"जाऊदे बाहेरून काही खाऊन घेजो? तुझा मित्र ही जेवायचा असेल ना?"
मी:"हो बघतो काही तरी?"
आई:" बरं पहा मग नाही तर वहिनी काढत होती तुझी आठवण?"
मी:"नाही मी नाही जात, दूर आहे खूप?"
आई:" गाडी आहे ना पण?"
मी:"नाही ना?"
फोन कट झाला. काही वेळाने डिजे मटण घेऊन आला. दिवसाच्या वेळेला मटण खाण्यात काही तरी वेगळाच आनंद होता. मटण शिजत होतं.
मी:"हो पण, का माहीत मजा नाही येत आहे? आपण आयुष्यात आणखी काही केलं नाही आणि बोर वाटत आहे का माहीत तर सगळ."
डीजे:"तू त्या अथर्व ची गोष्ट मनावर लावून घेतली का?"
मी:"अस नाही त्याची आणि आपली कुठ बरोबरी? त्याचा रेसूमे वाचला का तू? त्यावर जितक्या अचिएवमेंट आहे तितके तर एक्झाम ही माहित नाही आपल्याले."
डीजे शिजलेले मटन बाजूला काढलं आणि मान हलवत बोलला "तू ना लय चिवताई आहे, आपण ही काही करू? मन कशाले मारा लागते? तुझं ते प्रोजेक्ट चालू होता त्याच काय झालं."
मी:"कठीण आहे, अन जमला तरी वरून प्रेझेंटेशन स्किल्स चांगली पाहिजे, आपली कुठ आहे?"
डीजे पुन्हा मान हलवत माझ्या कडे बघत राहिला:"लवड्या तू सगळा चांगला जेवायचा मूड भोकात घातला. आता मुठ्ठ्या मारल्याशिवाय डोकस जाग्यावर येत नाही. ते बिन जेवणाच्या टाइम ले."
मी:"खरच सांग काय करायला पाहिजे आपण, कॉलेज कडून चांगला जॉब भेटणं अस वाटत तर नाही."
डीजे एकदम चिडून बोलला:"मी सांगू का? मी जेवतो सध्या, तू तरी क्वांटिटीटिव फायनान्स न झाट काय माहित कायच्या माग लागला, म्या तर अजून काही केलं नाही तरी खुश आहे."
मी:"तुझ्या घरी काही म्हणत नाही ना, माझ्या घरी तर कायच सांगू दादा, वहिनी आणि आई सगळे भुता सारखे मागे लागले, काही तर झालं पाहिजे? म्हणत नाही पण समजून येते, बाबाले तर काही जशी आशा च नाही माझ्या पासून."
डीजे थोडा शांत झाला :"अबे, तसंच असते ते, काळजी आहे तेयले तुझी. म्हणून मला काय वाटते तू बिनकामी घरचा विचार करत आहे, हे पाय तुझी लाईफ जे आहे ना एखाद्या पॉर्न सारखी आहे तिथं मी काही करू शकत नाही पण कोणी तरी झवत आहेच ना?"
डिजेला किती ही शिव्या दिल्या तरी त्याला काही फरक पडत नाही, कारण त्याची पांचट बोलण्याची पद्धत काही बंद होणार नव्हती. तसं डीजे माझा जवळचा मित्र पण त्या सोबत आणखी काही मित्र होते. ज्यातला एक रियाशं जो की mba करत होता जो की माझा जुना मित्र होता आणि संजू जो की डीजे चा शाळेतला मित्र डीजे मुळे आमच्या इथे यायचा.
दोन तीन दिवस अशेच गेले, एक दिवस आम्ही चौघ बाहेर होतो. कॉलेज मध्ये खूप सारे ग्रुप होते ज्यातले लोक एकमेका सोबत फिरायचे त्यात मी आणि डीजे एक ग्रूप होता, म्हणजे कधी कधी जायचो बाकी काही कॉलेज मधल्या सोबत फिरायला. पण आम्ही वेगळेच होतो.
तेवढ्यात अथर्व दिसला तो एका हॉटेल मधे त्यांच्या ग्रुप मधला सार्थक चा बर्थडे सेलिब्रेट करत होता, तिथे आणखी दोन आमच्या वर्गातली मूल आणि त्यांच्यासोबत गौरी, वैष्णवी आणि एक मुलगी ही होती.
"काय पोऱ्या आहे बे." संजू बोलला.
"तेच म्हणत होतो मी आमच्या वर्गात त्या गौरी एवढे कोणाचेच नाही." हे कोणी नाही डिजे च बोलला.
"नसणारच, काय आहे ते? खरच यार, तुमच्या सोबत पाहिजे होतो
मजाच आली असती." संजू जेवता जेवता बोलला.
डिजे:"उलट सजा आहे, अस राहण तर. सगळ्यांना gf आहे, मी तर आता घरी गेलो की बुड्याले म्हणतो की भोकात लग्न करून द्या बा माय?"
संजू:"चाल बरं मग ओळखी तरी करून दे."
मी:"जाऊ दे न बिनकामी धंदे कशाले करा लागते."
संजू:"साहिल, पण मले ते पिवड्या ड्रेस वरची पोरगी नाही का तिचा नंबर तरी दे"
मी:"माझ्या पाशी कुठचा."
संजुने मग नजर डीजेकडे फिरवली, डिजे ने नाही मधे मान हलवली.
संजू:"बर मग नाव काय आहे तिचं, ते तर सांगा?"
मी:"वैष्णवी."
इतक बोलता बोलता माझी नजर वैष्णवी वर गेली तिच्या इतकी सुंदर मुलगी खरच नव्हती, म्हणून माझी कधी तिच्या सोबत बोलण्याची हिंमत ही नाही झाली. ती तशी माझ्याच गावातलीच होती हे अजून मी डिजे ला सुद्धा सांगितलं न्हवत. सांगितलं असत तर आता पर्यंत त्यानेच माझ्या द्वारे प्रयत्न केले असते. ते मला थोड का तर चुकी
च वाटलं. आम्ही काही वेळाने चालल गेलो, त्यांनी आम्हाला ओळखलं तर होत पण आम्ही खूप दूर होतो.
....लाईक करा आणि आपला प्रतिसाद द्या. लवकरात लवकर पुढचा भाग येईल. जमल तर आज ही येऊ शकेल.
वैष्णवी तिच्या मित्र मैत्रिणी सोबत कॉलेजच्या कॅन्टीन मधे गप्पा मारत होती.
"खरच येईल" वैष्णविला श्रेयस त्याच्या बहिणीच्या लग्नाला येण्यासाठी आग्रह करत होता.
"हो तिला यावच लागण, नाही आली तर मी उचलून आणील तिला." अथर्व बोलला त्यावर वैष्णवी ने डोळे वरती करून अथर्व कडे पाहिले.
"हा मग ठीक आहे, तिला आणण्याची जबाबदारी तुझी." श्रेयस ने तर बोलून दिलं पण वैष्णविला समजल नाही की दोघ काय बोलत आहे तिला थोडा राग ही आला, पण सगळ्याचे हाव भाव पाहून ती काही बोलली नाही.
"तशीही सगळ्यात लवकर मीच तयार झाली होती सार्थक च्या वाढदिवसाला, मला जायचं असेल तर तुमच्या सगळ्यांच्या पुढे मी राहते." वैष्णवी बोलली.
"मग आली का नव्हती आधी?" सार्थक ने विचारलं.
"ही गौरी तिच्या मुळे." वैष्णवी म्हणाली.
"सगळे थोडी इतके कॉन्फिडन्ट असतात स्वतःच्या लूक्स बदल, की दहा वेळा आरश्यात बघण्याची गरज नाही पडत." गौरी नाक वर करून बोलली.
"होका?" वैष्णवी तिच्या गुलाबी ओठांवर हसू आणत म्हणली.
तेवढ्यात अथर्व बोलला.
"हे बघा, तुमचं ठरलं का कॉलेज झाल्यावर काय करायचं ते?"
"खूप वेळ आहे अजून आता पासून काय विचार करत बसत यार?" श्रेयस म्हणाला.
अथर्व:"पण तरीही त्या हिशोबान वाटचाल कराव लागण ना? माझं तर ठरलं चेन्नई ला ॲडमिशन करीन भारतातलं सर्वोत्तम पोस्ट ग्रॅज्युएशन साठी कॉलेज आहे."
सार्थक:"हो अथर्व चा विचार काही चुकीचा नाही पण मी जमलं तर बाबा सोबत त्यांचाच फर्म मधे जाईल."
अथर्व:"हो पण तुला जॉब च करायचा असेल तर आहे ना उपाय चांगले तुझा रिस्यूम बरा आहे."
वैष्णवी त्यांचा करियर बद्दल च्या गोष्टी ऐकून विचारात होती. तिला तिच्या वडिलांना स्वतःच्या पायावर उभ राहून दाखवायचं होत तिची आई आणि मोठी दोघींना अभिमानाने फुलउन आणायचं होत. तशीही ती घरची लाडकी होतीच.
सगळ्यांनी त्यांचे मत व्यक्त केल्यावर सगळे वैष्णवी कडे वळले.
"मग वैष्णवी तुझा काय विचार आहे?" सार्थक चा प्रश्न ऐकून वैष्णवी स्वतःच्या विचारातून बाहेर आली.
"माझं CFA करण्याचा विचार होता." वैष्णवी बोलल्यावर सगळ्यांना काही नवल नाही वाटलं. ती करू शकतेच हे त्यांना माहित होतच.
अथर्व:"CFA साठी काही तरी तासांचा वर्क एक्स्पेरियन्स चार हजार काही तरी."
वैष्णवी:" हो पण त्यातला काही कॉलेज मधून कटू शकते."
गौरी :"झाली मग तू, घरचे काय म्हणते याबद्दल?"
वैष्णवी:"काय म्हणणार आहे, त्यांना तर एवढ समजत नाही पण दादा आणि माझ्या चुलत बहिणींना मी सांगितलं त्यांना ही इतकचं कळाल की आपल्या इथे जितका पैसा आहे त्यापेक्षा जास्त मिळेल बस."
___________
संध्याकाळ चा वेळ होता, बाया स्वयंपाक करत होत्या.
एक बाई बोलली "खरच, माणसाला कितीही सांगतो तरी काही समजत नाही."
यावर सुलोचना बोलली "जाऊदे, अनिल भाऊजी भोळे आहेत, उलट जास्त हुशारपणा आला तर, आमच्या सारखं होईल."
"ताई, पण तसं सरळ तुमच्या खोलीत जाण शोभत का त्यांना?" सुलोचना ची जाऊ सुमन बोलली.
" जाऊदे पुढच्या वेळेस समजावून सांग बरोबर, आणि तसं मीच बोलत होती यावेळेस पण काय, गोष्टच अशी झाली तर कस करावं?" सुलोचना बोलली.
"मला ही काही सुचत नाही आहे, अर्पित कधी येतो म्हणे?" सुमनने विचारले.
" जितक्या लवकर येणं होईल तसं, पण ऐकलं पाहिजे माणसानं अर्पित च." सुलोचना बोलली तेवढ्यात तिची मोठी जाऊ स्वयंपाक घरात आली. अर्पित सुलोचनाचा मुलगा होता.
"काय ऐकलं पाहिजे अर्पित च?" मोठ्या जाऊने विचारल.
दोघीही थोड्याशा घाबरल्या, पण सुमन हिंमत करून बोलली.
"हेच की पोरीच शिक्षण चालू आहे, आणि लग्न" सुमन अचानक थांबली "नाही नाही सौदा इतक्या लवकर करू नका."
"हे काय बोलत आहे सुमन, तुमच्या दोघींना ही गोष्ट वैष्णवी चा जन्म व्हायचा आधी पासून माहित होती, आणि आता त्यावर समजावून–रागावून काय होणार आहे,तेव्हाच बोलायचं होत काय ते." मोठीजाऊ कठोर शब्दात बोलली, दोघी ही जाऊंचा चेहरा सुन्न पडला.
पण तरीही हिंमत करून सुमन बोलली "ताई, तुम्ही मोठ्या आहात तुम्ही कस भाऊजींच्या गोष्टीला हो ला हो लाऊ शकता माहित नाही, पण वैष्णवी का तुमची मुलगी नाही का, ती तर तुम्हाला सुलोचना ताई पेक्षा जास्त मानते."
मोठ्या जाऊने यावर काही उत्तर नाही दिलं आनी मान ताठ करून घोषणा केली. " लवकर आटपा, माणसांना भूक लागलीय." आणि लगेच बाहेर चालली गेली.
ललिता बाहेर गेल्याबरोबर सुमनने सुलोचना कडे पाहिले, सुलोचनाचे डोळे ओलावले होते.
"वैष्णवी ला सांगितलं का तुम्ही?" सुमन च्या बोलण्यावर तिला उत्तर मिळालं नाही. पण तिला माहित होत इतकी हिंमत सुलोचनात नव्हती.
बाहेर जशी ललिता गेली तिच्यासमोर रागाने तिचा मुलासारखा देर अनिल उभा होता,
"वहिनी तुमच्याकडून मला ही अपेक्षा नव्हती?" अनिल डोळे मोठे करत बोलला, अनिलने या आधी इतक्या जोरात कधीच ललिता वर आवाज काढला नव्हता. ती अनिल च्या आई समान होती.
"अनिल!" ललिता एकदम चक्क उभी होती.
"वहिनी मी या आधी तुम्हाला कधी बोललो नाही , तुमचा शब्द माझ्यासाठी आदेश होता, पण हा प्रश्न आपल्या वैष्णवीच्या आयुष्याचा आहे. तुम्हाला तीच लग्न करायचं होतं मला त्या शी विरोध नाही पण ती आपल्या घरात सगळ्यात हुशार आहे, तिच्या शिक्षणाचा मधात येऊन लग्न काढणं हे सुरेश दादाने चुकीच केलं पण तुम्ही समजावून सांगण्याच्या बदल्यात त्यांची साथ देत आहात." अनिल बोलतच गेला.
ललिता:"अनिल, हा प्रश्न वैष्णवी चा राहिला नाही, हा आई बाबांचा प्रश्न आहे, त्यांनी ठरवलं होतं, आणि आता हा प्रश्न सुरेश आणि त्याची मुलगी वैष्णवी दोघातला आहे."
अनिल:"वैष्णवी, तिला तर काही माहित नाही आणि सुरेश दादाने ठरवून ही टाकलं, मनोहर दादा आणि तुम्ही त्यांना समर्थन करत आहात."
ललिता:"अनिल, वैष्णवी ने जर नाही म्हटल तर मीच हे लग्न होऊ देणार नाही."
अनिल ऐकून शांत झाला, स्वयंपाक खोलीत कान लावून ऐकणाऱ्या बायांना ही थोडासा धीर आला.
लाईक करा आणि आपला प्रतिसाद नोंदवा जर ही कहाणी चालू ठेवायची असेल तर.
अनिल ऐकून शांत झाला, स्वयंपाक खोलीत कान लावून ऐकणाऱ्या बायांना ही थोडासा धीर आला.
भाग 4
संध्याकाळचा वेळ होता सुलोचना तिच्या नवराजवळ बसून होती. तिने काही गोळ्या सुरेश जवळ दिल्या आणि पाणी हातात घेऊन उभी राहिली. सुरेश ने गोळी घेतली पाण्याचा ग्लास जसा हातात घेतला त्याचा लक्षात आले की सुलोचना रागात आहे.
"जर काही बोलून द्यायचं असेल तर दे? मग मी सगळ्यांसमोर एक शब्द ही ऐकून घेणार नाही." सुरेशच बोलण ऐकताच भीतीने सुलोचनाने मान खाली केली आणि लगेच वर करून बोलली.
"वैष्णवी बद्दल विचार केला का कधी?"
सुरेश थोडा संतापला होता पण शांत मनाने त्याने पाणी पिऊन ग्लास ठेवला.
सुरेश: "वैष्णवी माझ्या विरोधात कधी जाणार नाही, आणि केव्हातरी लग्न करायचच होत ना?"
सुलोचना:"हो तुम्ही विश्वास ठेवा पण तिच्या स्वप्नांच काय जे आपण दाखवलं आणि आता त्याचा तुम्ही छळ करत आहात ना?"
सुरेश:"सुलोचना, मला तू पुन्हा पुन्हा सांगायला लावू नको, मी तर आधीच म्हणत होतो की तिला माहित असू दे की तिच्या साठी आपण काय ठरवलंय पण तूच होती की मला सांगू देत नव्हती."
सुलोचना:"पण मग तिच्या शिक्षणाचं काय?"
सुरेश:"शिकून काय होणार आहे? आज काल तशाही शिकून कोणाला नोकऱ्या लागत आहे."
तसा वैष्णवीच्या शिक्षणापाई तिचाच अट्टाहास होता पण तरीही सुलोचनाला वाटलं नव्हतं की ती सुरेश च्या तोंडून अशी शब्द ऐकेल.
सुलोचना "कसे बाप आहात तुम्ही? निदान कोणी असता तर अस तरी म्हटल असतं की तो मुलगा आपल्या मुलीबरोबरच शिकत आहे, त्याच्यासोबत ती ही शिकेल."
सुरेशने नाही आवाज वाढवला, ना कल्ला केला पण त्याच स्वरात तो बोलला "आपण आता काही करू शकत नाही, मी माझ्या हातात होत ते केलं. एवढ शिकवलं ते बस, आणि पुढचा निर्णय आपला नाही तिच्या सासऱ्याचा आहे, खास करून श्यामरावचा"
सुलोचना एकदम शांत झाली तिला आठवला तो दिवस, तो दिवस ही आजच्या सारखाच होता जवळ्पास सगळेच दिवस आजच्या सारखे नव्हते जेव्हा तिचे सासरे जिवंत होते, तिचे सासरे सुलोचना साठी जगातले सर्वात चांगले मनुष्य होते. आयुष्भर कोणाला त्रास नव्हता. त्यांच्या समजुद्दार पणामुळेच मुळेच ही गोष्ट घराबाहेर ही नाही निघाली, आणि त्यांच वडिलासारख्या छाये खाली तिने आपल्या मुलीच सुंदर आयुष्य पाहण्यात स्वप्न बघितलं, कारण तिला माहित होत तिचा नवरा भलेही साथ देणार नाही पण वडिलांसारखा बाप नक्की देईल आणि जेव्हा त्याचं श्यामराव सोबत भांडण झाले तेव्हा स्वतः सुलोचणाला आश्वासन दिलं, की तिच्या त्या शामराव दिलेल्या वाचनाला काही अर्थ राहिला नाही. पण तोच माणूस जेव्हा काही महिन्यापूर्वी मरण्याच्या दारात होता, त्याने हेच वचन स्वतःच्या मुलाला मागितलं की वैष्णवीच लग्न श्यामरावच्या नातवाशीच व्हावं.
सुलोचना विचारात गुंतून होती तेवढ्यात सुरेशने फोन घेतला.
"हॅलो वैष्णवी." सुरेश म्हणाला.
वैष्णवी: "हा बाबा."
गौरी जी खूप वेळेस पासून वैष्णविला तिच्या वडिलांसोबत बोलताना पाहत होती, फोन करतास सरळ बोलली.
"इतका वेळ काय बोलत बोलत होती."
वैष्णवी:"काही नाही, ते मला घरी बोलावत आहे."
"अचानक! काही झालं का?." गौरी च्या डोक्यावर चिंतेच्या रेषा उमटल्या.
"नाही, झालं काही नाही. आजोबांच्या मित्राच्या घरी आम्हा सगळ्यांना जेवण करायला बोलावलं, मागच्या महिन्यात माझे आजोबा वारले नव्हते का म्हणून, माझा अर्पित दादा आणि माझे चुलत बहीण भाऊ सुद्धा येत आहेत."
गौरी: "अस काही असते का?"
वैष्णवी :" काय माहित? पण माझ्या आजोबांचे आणि त्यांच्या मित्राचे तसेही भांडणं होते खूप दिवस अस मी ऐकलं म्हणून मी त्यांना पाहिलं सुद्धा नाही. आता शेवटच्या क्षणी माझ्या आजोबांचं पटत होत त्यांच्या सोबत म्हणून बोलावलं असेल ."
गौरी:" बर आहे बा मजा आहे तुझी. सुट्टी घ्या गावी जा, आम्ही इथेच, कधी जायच आहे मग तुला?"
वैष्णवी:"दोन दिवसाने."
________________
"एका हफ्त्याच्या आत" डीजे त्यांचाच अंदाज मधे म्हणाला. आम्ही दोघं आमच्या खोलीच्या बाल्कनीत बसून होतो.
"आता काय करूं?" माझे पाया आता स्थिर नव्हते. माझं ही काही स्वप्न होत. माझ्या आई वडिलांच्या नजरेत मोठ होतच पण त्यासोबत मला माझ्या आयुष्याच्या ठराविक गोष्टी मला माझ्या मर्जीने करायच्या होत्या. आपला एक छोटासा संसार असावा हे प्रत्येक माणसाला वाटत. पण त्यात आपलं काही तरी म्हणणं असावं लागत. मी इथे पोहोचलो असतोच, पण मला ढकलून आणलं गेलं होतं.
माझ्या घरच्यांची ही जुनी पद्धत होती. आपण इच्छेने पाया पडत असलो तरी मान धरून नाक रगडावने काही नवीन नव्हतं.
मी केलं असत त्यांच्या मनाने लग्न पण त्यात काही माझं त्यात काही तरी म्हणणं असायला हवं होतच.
"तुझं जर मन नसेल तर करू नको. जबरदस्ती थोडी लग्नात बसवणार आहे." डीजे शांत झाला त्याने क्षणभरासाठी तोंड उघडलं आणि शब्द निघायच्या आधीच बंद झालं
"काय करावं समजत नाही आहे, हा माझ्या आजोबांचा निर्णय एकतर मी कधीच त्यांच्या विरोधात गेलो नाही." मी बोललो, पण पुन्हा डीजे अडकला जसे की त्याच्याकडे शब्द नसावे.
खूप वेळ त्या थंडीच्या वातावरणांत बाल्कनीत बसून होतो.
मग डीजे च बोलला.
"मग करुण टाक लग्न, तसही आपण या त्या पोरीच्या मागं लागतोच, उलट हे तुझ्यासाठी चांगलच आहे." मी हे ऐकून डीजे कडे डोळे लावून पाहील, कारण यात तर नवल नव्हतं की डीजे शिवाय अस कोणी बोलूच शकत नाही.
"बर जाऊदे, संजू चा मेसेज आला, बाहेर चालत का म्हणते फिरायला. मी सध्या नाही म्हटल कॉलेज च काम आहे सांगितलं." एवढ बोलून काही वेळ न बोलता तसाच चालला गेला.
मी एकट खूप वेळ विचार करत बसलो.
दुसऱ्या दिवशी कॉलेज मध्ये आल्यावर खूप विचित्र वाटत होत. आपल्या वयाचे मूल काय करत आहे आणि आपण काय.
डीजे ही शांत होता, मग अचानक जागेवर उभा राहून बोलला.
"हद्द झाली यार, मले वाटलं की कॉलेज मधे आणून मन चांगलं होईल तुझं पण नाही." तो इतका बोललाच की त्याच्या मागून सार्थक आणि श्रेयस उभे होते.
"काय झालं, काय धांदल चालू आहे तुमच्या दोघांची. कौन डिजे ने चीट केलं का तुझ्यावर?" श्रेयस हसून माझ्याकडे पाहत म्हणाला. मला हे माहीत ही नव्हत की श्रेयस ला माझं नाव माहित आहे की नाही तर.
डिजे: "हो, तुया आई सोबत पकडलं मला त्यान, आणि आता मी समजावून सांगत आहों की साहिल तुला ही देतो म्हणते चान्स ती रांड." डिजे बोलण श्रेयसला खरच झोंबल, डीजे ला तसा लवकर राग येत नाही पण हे नवीन होत. मी पाहील तर आसपास सगळे सगळे शांत झाले. माझ्या मागच्या बेंच वर रोहित जोरात अचानक खोकल्ला. श्रेयस काही वेळ तसाच उभा होता आणि मग अचानक डीजे वर झडपला. पण क्षणभर वाया न घालवता मी दोघांच्या मधात आलो, पण घाई घाईत मा
झ्यामुळे श्रेयस शेजारच्या बेंच वर आपटल्या गेला.
मी पाहील तर आसपास सगळे सगळे शांत झाले. माझ्या मागच्या बेंच वर रोहित जोरात अचानक खोकल्ला. श्रेयस काही वेळ तसाच उभा होता आणि मग अचानक डीजे वर झडपला. पण क्षणभर वाया न घालवता मी दोघांच्या मधात आलो, पण घाई घाईत माझ्यामुळे श्रेयस शेजारच्या बेंच वर आपटल्या गेला.
भाग 6
वर्गात गोंधळ चालू होता. श्रेयसने उठून माझ्या अंगावर येण्याचा प्रयत्न केला पण मग वर्गातले काही मूल मधात आली. मला दुरूनच आवाज आला "तू कोणाच्या मागं लागत, गावठी आहे ते गावठी." तो आवाज अथर्व चा होता की सार्थक चा की जय चा पण तो त्याच्याच मित्रांमधून कोणाचा तरी होता.
काही वेळानंतर वर्ग शांत झाला, तसही आम्ही दोघं इतके प्रसिद्ध नव्हतो. ती मूल होती म्हणून गोंगाटा ही त्यांच्या कडेच जास्त होता.
"तुला भलताच जास्त राग आला." मी डिजे कडे पाहून म्हटलं.
डिजेच्या चेहरा खुलण्याआधी त्याच्या खांद्याने मोकळा झाला आणि हसत म्हणाला.
"काय करावं? तू लग्न करत आहे आणि आपण इथे सिंगलच मरतो अस वाटत आहे, राग तर येणारच."
मी:"असा काय फायदा? पोरगी कशी आहे काय माहित, फोटो मागितला तर पाठवणार नाही."
डीजे:" ओ हो! तयार झाला वाटते लग्नासाठी."
मी: "नाही, पोरगी पाहतो कशी आहे नाही आवडली तर गायब तिथून मी."
डिजे:"एक नंबर, मग मला पत्रिका काही आहे की नाही?"
मी त्याच्या कडे डोळे वटारून पाहील : "मी लग्न करील याची मला खात्री नाही आणि तू पत्रिकेच गोष्ट करत आहे."
डीजे:"रियान्श ले सांगितली का ही गोष्ट."
मी:"नाही मीच सांगीन तुझा भरोसा नाही काय सांगशीन म्हणून."
तिकडे पार्क मधे चार मूल आणि तीन मुली बसून होत्या. श्रेयस बाकड्यावर बसून होता, त्याच्या आस पास बाकी मुल गोळा झाली होती. त्याच्या जवळ स्नेहा आणि सार्थक बसून होते बाकी वैष्णवी, गौरी , जय आणि अथर्व उभे होते.
श्रेयस: "स्नेहा, आम्ही फक्त विचारलं काय चालू आहे त्यानेच सरळ माझ्या आईवर शिवी दिली. मग किती ही शांत माणूस असला तर ऐकून थोडी घेणार आहे."
सार्थक ने ऐकल्याबरोबर श्रेयस कडे पाहिलं. श्रेयस ला ही जाणवलं त्याने फक्त डोळे खाली केले.
स्नेहा: "इतका कसला माज आहे त्या दोघात? त्यायची औकातच काय आहे."
सार्थक:"हो पण आमच बीन चुकलं..."
अथर्व:"तुम्ही त्यांच्या नादी लागलेच नव्हत पाहिजे, माझ्या तर प्रोजेक्ट ग्रुप मध्ये आहे मी तरी ही जास्त बोलत नाही तेच्या सोबत आता तर दाखवतोच माझ्याशिवाय प्रोजेक्ट कसे कंप्लीट करते तर."
गौरी : "मी म्हणतो त्या पेक्षा आपणच त्यांच्या दोन हात दूर राहायचं एवढ केल्यापेक्षा. त्यांच्या तोंडी लागून काहीच होणार नाही."
थोडा वेळ बोलून झाल्यावर
अथर्व : "वैष्णवी, तू घरी जात आहे मला सांगितलं सुद्धा नाही."
वैष्णवी :"त्यात सांगायचं काय आहे? मी सांगतच होती पण हे सगळ झालं म्हणून राहील."
वैष्णवी बोलल्यावर सगळ्यांच्या नजरा अथर्व कडे गेल्या त्याने काही तरी इशारा केला.
गौरी: "काही नाही, घरी गेल्यावर फोन करजो आम्हाला."
स्नेहा: "पाहा नाही तर फक्त गौरी लाच फोन करशील तू?"
वैष्णवी:" जर वेळ भेटला तर नक्की करीन, घरी गेल्यावर थोडी फोन वर बोलू देणार आहे घरचे."
____
मी आता माझ्या भाऊ आणि वाहिनी सोबत घराकडे निघालो होतो माझ्या दादाच्या गाडी मध्ये. सगळ्यांना गोष्ट माहित होती, फक्त मला सोडून. मुलगी कोण आहे हे कळणारच होत. माझी लहानशी पुतणी खुशी जरा जास्तच खुश होती लग्ना बद्दल. तिच्या साठी तर तिच्या बाबाचं लग्न होत. श्वेता माझी भलेही किती ही लाडकी असली तरी मला सध्या या गोष्टीचा राग येत होत होता. पण मी तिला काही बोलू शकलो नाही.
माझा भाऊ, मयूर इथे शहरात जॉब वर होता. ते इथे असून सुद्धा मी महिन्यातून एक दोन वेळी भेटी साठी जायचो ते ही मला खुशीची आठवण आली की. वहिनी सोबत माझं काही वैर नव्हतं ते फक्त माझं आणि माझ्या भावाच काही एवढ पटत नव्हतं. आता त्या गोष्टीला काही कारण लागत नाही, पण माझ्या भावाच मला छोट्या छोट्या गोष्टी साठी टोकन मला कधीच आवडत नव्हत.
आता सगळे शांत होते शिवाय खुशी. ती मस्त बडबड करत होती.
खुशी:"ककाआ, काकूच नाव त्काय आहे?" हे गोष्ट आता लाजिरवाणी होती, जे माझ्या वहिनीला ही समजली की, मला नाव माहित नव्हतं की माझं लग्न कुणाशी ठरलं आहे. मला लग्न करायचं आहे की नाही ते ही मला सध्या माहीत नव्हत. मी घरी विचारलं पण कोणी उत्तर दिलं नाही.
वहिनी: "वैष्णवी, वैष्णवी आहे तुझ्या होणाऱ्या काकूच नाव."
नाव ऐकताच माझ्या छातीचे ठोके एकदम वाढले. आणि का वाढणार नाही, कारण वैष्णवी जी माझ्या एकदम लक्षात आली ती असेल तर....
लाईक करा, आणि प्रतिक्रिया व्यक्त करा, पुढचा भाग लवकर येईल.
नाव ऐकताच माझ्या छातीचे ठोके एकदम वाढले. आणि का वाढणार नाही, कारण वैष्णवी जी माझ्या एकदम लक्षात आली ती असेल तर...
भाग 7
वैष्णवीच्या घरी तयारी चालू होती.
स्वयंपाकघरात कढईचा आवाज, भांड्यांची धडधड — पण हसणं नाही.
तिच्या चुलत बहिणी स्वयंपाकात गुंतल्या होत्या,
डोळे खाली, बोलणं कमी.
वैष्णवीला विचित्र वाटलं.
बाबा म्हणाले होते — “आपण जेवायला जाणार आहोत.”
मग इथे स्वयंपाक का?
“बाबा, आपण बाहेर जाणार होतो ना?”
तिने सहज विचारलं.
सुरेशने मान हलवली.
“हो… हो… थोडं आधीच करतोय.”
उत्तर पूर्ण नव्हतं.
घरातलं वातावरण गरम होतं —
कोणी रागात नव्हतं, पण सगळे अस्वस्थ होते.
तिचा भाऊ बाबांशी बोलत नव्हता.
तिच्या ताई शांत होत्या.
नेहमी थट्टा करणारे जावईही आज शांत होते.
वैष्णवीचं मन अजून अस्वस्थ झालं.
“रेखा ताई, बाबू कुठे आहे? लेकरं का नाहीत?”
तिने विचारलं.
रेखाने नजर खाली ठेवत उत्तर दिलं.
“शाळा आहे सगळ्यांची.”
तेवढ्यात मागून आवाज आला.
“वैष्णवी.”
ती वळली.
मोठी आई आणि बाबा उभे होते.
क्षणभर सगळे थांबले.
मोठी आई काही न बोलता पुढे आली.
“इकडे ये.”
खोलीत
वैष्णवी तिच्या मागे खोलीत गेली.
पलंगावर तीन–चार नवीन साड्या मांडलेल्या होत्या.
“हे घे.”
मोठी आई म्हणाली.
“यातली जी पसंत असेल ती घाल.”
वैष्णवी हसऱ्या चेहऱ्याने म्हणली.
“साडी का?”
मोठी आईने नजर चुकवली.
“तुला पाहायला येणार आहे म्हणून.”
त्या शब्दांनी खोलीत हवा थांबली.
“पाहायला…?”
वैष्णवीचा आवाज बदलला.
तिने सरळ बाबांकडे पाहिलं.
डोळ्यांत पाणी जमा झालं.
कंठ दाटला.
“बाबा…”
ती शब्द शोधत होती.
“माझ्याच्याने काही चुकलं का?”
तिचा आवाज फुटला.
“तूम्हि जे म्हणाल ते करीन…प्लीज
पण अशी थट्टा करू नका.”
सुरेश काही क्षण काहीच बोलला नाही.
“वहिनी…”
इतकंच म्हणताच मोठी आई बाहेर गेली.
बाहेर ती रेखाच्या मिठीत कोसळली.
“माझी पोरगी रडली ग…”
आणि तिचा अश्रूचा बाण तुटला.
आत सुरेशने हळूच वैष्णवीच्या गालावर हात ठेवला.
तिचे अश्रू थांबत नव्हते.
श्वास बेशिस्त झाला होता.
“पोरी…”
त्याचा आवाज कापरला.
“मला माफ कर.”
तो खाली बसला.
“तुझा बाप तुला भीक मागतोय.”
त्या वाक्याने वैष्णवी आतून तुटली.
“मी आई–बाबांना दिलेलं वचन मोडू शकत नाही.”
“एकदा… फक्त एकदा माझ्यासाठी हे कर.”
तो रडत नव्हता.
पण त्याचं डोकं झुकलेलं होतं.
वैष्णवी उभी होती.
साडी, भिंती, घर — सगळं तिला दूर वाटत होतं.
एका बाजूला श्यामराव, सुरेश,वैष्णवी चे मोठे बाबा मनोहर, अनिल , आणि मनोहर चे दोन जावई.
दुसऱ्या बाजूला साहिल, मयूर त्याचा शेजारी अर्पित बसला होता.
बायका स्वयंपाकघरातून एकामागोमाग एक बाहेर येत होत्या.
सुमन आणि वैष्णवीच्या ताई वाढत होत्या.
काही वेळा नंतर मोठी आई वैष्णवीच्या हाती जिलबी दिली आणि पद्धतीनुसार वाढायच सांगितलं. ती विचारात गुण होती तिला हे ही कळलं नाही समोर कोण आहे.
आणि तेवढ्यात—
साहिलने मान वर केली.
क्षणभरासाठी.
फक्त क्षणभर.
पण त्या क्षणात,
त्याच्या हातातला घास थांबला.
डोळ्यांपुढे वर्ग, बेंच, डीजे, गोंगाट — सगळं एकदम शांत झालं.
तीच आहे.
तिला मात्र अजूनही कळलं नव्हतं.
तिने जिलबी वाढली.
ताट पुढे सरकवत सरकवत, ती त्याच्यासमोर येऊन थांबली.
ताटात हात ठेवून तो फक्त बसून होता.
साहिल काही सेकंद तिला पाहतच राहिला.
इतका वेळ की रेखाचा नवरा खोकलला.
“साहिल,” मयूर हळूच म्हणाला, “घे.”
तो दचकून सावरला.
“हो… हो,” म्हणत ताट पुढे केलं.
त्या क्षणी वैष्णवीने त्याच्याकडे पाहिलं.
ती जरा थांबली.
ओळख.
कॉलेजचा वर्ग.
तो शांत मुलगा.
भांडणाचा दिवस.
डीजे.
तिच्या हातातली जिलबी क्षणभर हवेतच थांबली.
तो इथे काय करतोय?
पण उत्तर काही एवढ कठीण नव्हत.
तिने चेहऱ्यावर काहीच दाखवलं नाही.
जिलबी ताटात ओतली. पुढे सरकली.
पण तिच्या पोटात कुठेतरी हलकंसं वळण पडलं.
“हे दोघं एकाच कॉलेजमध्ये शिकतात,” श्यामराव सहज म्हणाला, त्याने वैष्णवीचा सगळा पाठ पुरावा केलेला होता.
“ओळख आहे म्हणजे बरं आहे.”
कोणी हसले
.
कोणी मान डोलावली.
साहिल आणि वैष्णवीच्या कानात ते शब्द घुमत राहिले.
ओळख आहे.
दोघांसाठी ही अर्थ वेग वेगळे होते.
लाईक करा आणि प्रतिक्रिया द्या, तुमच्या प्रतिक्रिया असल्या तरच ही कथा चालू राहू शकते.
घरच्यांनी दोघांना बोलण्यासाठी वरती पाठवले.
ती पायऱ्यावर बसून होती.
मान खाली, दोन्ही हात एकमेकांत गुंतलेले.
मी तिथे गेलो.तिने मान वर केली, क्षणभर माझ्याकडे पाहिलं…आणि काही न बोलता उठून वरती गेली.
मी तिच्या मागे गेलो.आता आम्ही दोघं एकमेकांसमोर उभे होतो.नजरा मिळत नव्हत्या.भिंतीला टेकून उभे राहिलो होतो —
जसं कुणीतरी आमच्यामध्ये अदृश्य रेषा काढली होती.
मी अचानक तिच्याकडे पाहिलं.
दूधासारखा गोरा रंग,गालांवर हलकी गुलाबी छटा,
आणि सरळ, निळसर डोळे.ती सुंदर होती.
इतकी सुंदर की त्या क्षणी या सगळ्या गोंधळात ते एकमेव शांत वाटणारं सत्य होतं. आणि ही मुलगी माझी बायको होणार होती.
तो विचार मनाला धक्का देऊन गेला…
आणि क्षणभर दिलासा ही. खूप वेळ आम्ही तसंच उभे राहिलो.
मग आमच्या नजरा मिळाल्या. तिच्या नजरेत काही असहज पना नव्हता एकदम स्थिर होती.
“मला माहीत नव्हतं…” ती शांतपणे म्हणाली,“की तू इथलाच आहेस.”
“हो.”
मी इतकंच बोललो.
पुढे काय बोलावं मला कळलं नाही.आणि मग अचानक शांतात झाली यावेळेस मीच बोललो.
“तुला या लग्नाबद्दल आधी माहीत होतं का?”
“नाही, आज सकाळीच.” तिने पटकन उत्तर दिलं.
मी: “मला गुरुवारी कळलं.”
तिला शुक्रवारचा दिवस आठवला असावा त्यानंतर मी शुक्रवारी कॉलेज मध्ये ही आलो होतो. ते ऐकताच तिने भरदार नरम ओठ दातांमध्ये घट्ट दाबले.
“नाही—” मी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला.
“म्हणजे… तेव्हा मला माहीत नव्हतं
की तुझ्याशीच ठरणार आहे.
फक्त लग्न ठरलंय, एवढंच.”
एवढ ऐकून तिने हळूच श्वास सोडला.
काही वेळ ती थोडा वेळ इकडे-तिकडे पाहत राहिली.
विचार करत होती.मी नुसत तिला पाहत राहीलो.
मग ती पुन्हा माझ्याकडे वळली.
“हे बघ…”
तिने खोल श्वास घेतला.
“मी हे लग्न तोडू शकत नाही.”
मी काही बोलणार, तेवढ्यात ती पुढे म्हणाली.
“आणि भलेही हे असल तरी मी असंही म्हणणार नाही की हे लग्न फोर्सड आहे.”
“कारण…”
तिचा आवाज थोडा बदलला.
“मी माझ्या वडिलांचा राग करू शकत नाही. मी तुझ्या इथे कशी राहील हे तुझ्या आजोबांच्या आणि मोठ्यांच्या मर्जीने आणि ते फक्त माझ्या बाबांसाठी.”
ती आणखी थोडी थांबली आणि पुन्हा बोलली “आणि मला कळतंय की तुलाही हे लग्न करायचं नाही म्हणून.. आपण एकमेकांवर ओझं न होता जसं चालू आहे…
तसं चालू देऊ.”
ती शांत झाली.
मी काही बोललो नाही. कारण खरं सांगायचं तर मलाही माहीत नव्हतं की मला हे लग्न करायचं आहे की नाही. आणि आता एक वेगळाच प्रश्न समोर उभा होता—
आपण दोघं खरंच लग्न करायच्या लायकीचे आहोत का?
ती इतकी आकर्षक आणि सुंदर जशी की अप्सराची मूर्त , तिचा रंग सोन्या सारखा चमकणारा आणि दुधा सारखा गोरा होता.
ती हुशार होती, ते तिच्या बोलण्यातून स्पष्ट होतं. ती मला फसवू ही शकते इतकी हुशार तर होतीच.
वैष्णवी चे बाबा सुरेश आणि मोठे बाबा मनोहर दोघे खुर्ची वर बसून होते, जिथून काही अंतरावर माझे आजोबा बसून होते. सकाळी सकाळी ऊन बरोबर पायावर पडायची तर ते नियम बनला होता आजोबांचा पायरीवर बसून नख वगैरे काढायचा. माझे आजोबा अंगात धड धाकड व्यक्ती ज्यांनी त्यांच्या जवानीत कुस्ती खेळली होती. डोक्यावर बरोबर मधात टक्कल होती, सोबत पांढरी टोपी आणि पांढरा शुभ्र धोतर. माझी आजी जोपर्यंत जिवंत होती तोपर्यंत तिने रोज माझ्या आजोबांचा धोतर धुतला, म्हणून त्यावर कधी डाग नव्हता आता तेच काम माझ्या आईच होत. कारण आजोबा फक्त दोन जोडी धोतर वापरायचे.
"मामा" वैष्णवीचे मोठे बाबा थांबले आणि पुढे बोलले.
"ते वैष्णवीच्या बद्दल बोलायचं होत."
माझ्या आई ने माझ्या कडे पाहिलं मी हात वर केले की मला माहीत नाही काय आहे तर.
आजोबा:"काय म्हणते आमची सून?"
"चांगली आहे." वैष्णवीचे बाबा म्हणाले. "तिच्या शिक्षणा बद्दल बोलायचं होत."
आजोबा: "त्याच काय आहे? शिकवा, चांगलच आहे. आमच्या घरी शिकलेली सून येईल."
वैष्णवी चे बाबा :"हो, ती आता साहिल च्याच सोबत शिकत आहे. आता हे दोघं तिथे राहतील."
आजोबा:"बरं आहे ना खर्च वाचेल, खाण्या पिण्याचा. घरी करून बनवलं तर चांगलं ही राहते, मेस पेक्षा."
वैष्णवी चे बाबा :"हो."
वै. मोठे बाबा: " आता काही दिवसा आधीच बाबा वारले, आता लग्न आणि तिला पुढे क्लास वगेरे करावे लागेल त्या साठी पैसा लागतो, तर आमचं म्हणणं होत म्हणजे मीच म्हटलं श्यामराव मामाला सांगून पाहू करतील सध्याचा बंदोबस्त, मग देता येते तुम्हाला."
आजोबा: "चहा झाला का?" आतून माझ्या आईचा "हो" आला.
मी वाटल्यावर.
"घ्या चहा!" आजोबा म्हणाले आणि परत शांत झाले.
दोघांनी चहा पिला, माझे आजोबा चहा पित नसते. काही वेळ शांतता होती.
आजोबा: "हे बघा, तुझे वडील माझे मित्र होते, त्याच्या शब्दासाठी मी जीव दिला असता पण चुकीमुळे दोघात गैरसमज झाले आणि दोघ दुश्मन म्हणून खूप वर्ष राहलो."
इतक बोलून माझे आजोबा थांबले आणि दीर्घ क्षणानंतर पुन्हा बोलायला सुरुवात केली
"वहिनी, म्हणजे तुम्हा दोघांच्या आई त्यांनी मला वचन दिलं होत भांडणं होण्या आधी की त्यांची तेव्हा नात, म्हणजे वैष्णवीच लग्न ते माझ्या साहिल शी लावून देईल. पण भांडण झाले वाहिनी वारल्या आणि ते वचन राहील आता अठरा वीस वर्षानंतर पुन्हा आम्ही दोघे मित्र झालो आणि माझं नशीब इतक फुटक की मी फक्त त्याच्या शेवटच्या क्षणी होतो. मी लग्नाला मानल कारण वहिनी आणि माझ्या मित्रा मुळे आणि हे लग्न मी काही ही करून तुटू देणार नाही. सुन शिकते यासोबत मला काही वाटत नाही, आजकाल पोरी शिकतात. पण... " अचानक पुन्हा शांतता झाली, सगळे चहा चा कप ठेऊन ऐकत होते.
"शिकल्यावर कसले धंदे करतात आम्हालाही माहीत आहे. शिकू देत आहों तिला यात माझं मोठेपण समजा आणि असलि भीक मागण्या आधी विचार करत जा."
दोघांचे चेहरे आता एकदम उतरले होते. वैष्णवीचे बाबा एकदम रागात होते, आणि तिचे मोठे बाबांनी सरळ मान खाली घातली मला ही खूप वाईट वाटत होत. पण माझ्या आजोबांचा विरोध तोंडावर करण्याची हिंमत कुणातच नव्हती.
आजोबा मग उठले आणि हातात सोपं सुपारीचा डब्बा घेतला.
"हे घ्या सुपारी, तस जात असते का. सोयरे आहात तुम्ही."
वैष्णवीच्या वडिलांनी डब्बा हातात घेतला आणि नजर फिरवून माझ्या
बाबाकडे पाहील. बाबा काहीच बोलले नाही.
...लाईक करा आणि काय आवडलं ते सांगा. स्टोरी सुरू ठेवायची असेल तर.