• If you are trying to reset your account password then don't forget to check spam folder in your mailbox. Also Mark it as "not spam" or you won't be able to click on the link.

Horror काळ्या दरवाज्या मागिल रहस्य.

xforum

Welcome to xforum

Click anywhere to continue browsing...

Mr. Magnificent

Marathi section king
Supreme
5,715
4,290
189
पावसाळा सुरू झाला. आमच्या फ्लॅट वरती
बिल्डिंग ची गच्ची....घरात खूप पावसाचे पाणी
आले...आणि...ताबडतोब... घर बदलण्याचा
निर्णय घ्यावा लागला. या भाड्याने घेतलेल्या घराचा
दरवाजा दक्षिणेकडे......वास्तुशास्त्रात न बसणारा असा
होता.घरात अंधार होता....कुबट वास भरलेला होता.
पण...आमचे अहो.....त्यांच्या पुढे कुणाचेही चालत
नाही.... मी घर साफ केले.सामान लावले....देवाची
पूजा केली.दिवा लावला.उदबत्ती लावली.....पण
घरात उदासीनता भरून राहीली होती.मनच रमत नव्हते.
मी विचार केला....पावसाळ्याचे चार महिने तर काढायचे
आहेत....मी शाळेत टीचर होते.सकाळी सात ते दुपारी
साडेबारा मी शाळेत....आणि मी दुपारी घरी फक्त एकटीच
मुले शाळेत....आणी अहो आँफीसमधे.... असे आमचे
रूटीन होते.
या घरात प्रशस्त चार खोल्या होत्या पण प्रकाशाचा
जरा अभावच होता. त्यामुळे कदाचित ऊदास वाटते.
असे मला वाटले.
आतली खोली जरा जास्तच काळोख आणि.....मला
नक्की सांगता येत नाही पण.....तिथे एक काळा दरवाजा
होता.त्याला काळे कुलूप लावले होते.तिथे एक रूम होती.
त्यात घरमालकांचे काही सामान होते.त्यांनी ती रूम
स्वतःकडे च ठेवली होती.....जाम गूढ ,भीतीदायक असे
वाटायचे.....असे वाटे या काळ्या दरवाज्यामागे गूढ रहस्य
दडलेले आहे.
माझा धाकटा भाऊ मेडिकल ला होता.तो माझ्याकडेच
होता.पण जास्त करून हाँस्टेल वर असायचा....मला
तो नेहमी काही सांगायचा....आज प्रँक्टिकल ला बाँडी
आणली....आज चेहरा फाडला.....मला इतकी भीती
वाटायची की बस्....तो बोलायचा अग भुते नसतात.
पण मी जाम घाबरत असे...
अशीच एक दुपार....दुपारी/रात्री 12 ते3....ही वेळच
वाईट असते....मी शाळेतून आले.साडी बदलली..आणी
बाथरुम कडे हातपाय धुवायला जाणार... तर घरात खूप
कोलाहल ऐकू यायला लागला...खूप कावळे ओरडत
आहेत...भटजी मंत्र म्हणत आहेत...नकारात्मक... उदास
मी डोके गच्च दाबून धरले....समोरच तो काळा दरवाजा...
हो तिथूनच हा आवाज असावा...मी भारल्यासारखी तिकडे
चालत गेले....तर दरवाजातच....ती बसलेली...काळी
साडी...चेहऱ्यावर नाक,डोळेच नाही त....फक्त भोके...
केस मोकळे सोडलेले.....चेहऱ्यावर भोकेच भोके मी जोरात किंचाळले... किचनमधे गेले.तेथील दार घट्ट बंद
करून आतच बसले...अहो आल्यावर बाहेर आले. अहोंना सांगितले... त्यांनी पाहिले तर तसे काहीच नव्हते....
एक तर त्यांचा विश्वास नाही.... आणी मी प्रुफ करु शकत
नव्हते....
एकदा तर रात्री भाऊ आला होता....तो टी.व्ही बघत
बाहेरच झोपला होता...रिमोट त्याच्या हातात असूनही
टीव्ही कुणीतरी बंद करत होते....त्याने उठून पाहिले
तर टीव्हीची वरची बटणे पण बंद होती....
त्याने आंम्हाला ऊठवले....पण मुले झोपली होती...आंम्ही पण गाढ झोपलो ...घरात कुणीच नाही... मग वरची बटणे
कुणी आँफ केली.....
घरात काहीतरी अमानवी अशुभ, वावरत होते.माझ्यावर
कुणी विश्वास ठेवणार नाही.... मला काय करावे....सुचत
नव्हते.कधीकधी....रात्री घरातील उरलेले अन्न संपत होते
वाईट एकाच गोष्टीचे की.....भुते सगळ्याना...का दिसत
नाहीत.... मी घरात देवाचे नामस्मरण सुरू ठेवले.

दिवसेंदिवस माझी भीती वाढत होती.म्हणतात नं
'भित्यापाठी ब्रम्हराक्षस'...तसे मला सारखे भास व्हायला
लागले...घरात हालचाली जाणवू लागल्या.कुणीतरी आहे
याची तर खात्रीच पटायला लागली....
शनिवार.... सांज मावळत्या दिनकराला निरोप देत होती.
आणी यामिनी तिचा हात धरून खाली उतरत होती.या
अशा कातरवेळी... खूप हुरहूर वाटते....अगदी डोळे
भरून येतात...हो कारण यावेळी....निशाचरांचा वावर
असतो.म्हणूनच तर देवापाशी दिवा लावतात. उदबत्ती
लावतात....धूप,कापूर.....जाळतात....शुभंकरोती
म्हणतात....त्यामुळे निशाचर पळून जातात.... मी पण
सांजवात लावली.शुभंकरोती म्हणाले.... देवाला नमस्कार
केला.....
शनिवारी भाऊ माझ्याकडे असायचाच.....रात्री मुले झोपली.मी अहो,आणि भाऊ पिक्चर बघत होतो.लाईट
बंद होते
.मी सगळ्यांना काँफी केली.
भाऊची बडबड सुरु होती.तो खूप विनोदी आहे. तो
सांगत होता....आज प्रँक्टिकल ला जाम मजा आली.
एका वीस बावीस वर्षाच्या मुलीची डेडबाँडी आली.
खूप वाईट वाटले.....कुणी फसवले असेल....मुलगी
सुंदर होती....आणि सरांनी मलाच तिचा चेहरा
फाडायला सांगितले.... मी पुढे झालो....आणी
अचानक....
आंम्ही हसत होतो...."गप रे तु!!!"मी बोलले
मी हळूहळू चेहरा फाडला....आणि
अचानक कुणीतरी आमच्या तिघांच्या समोर येऊन बोलले
"तो चेहरा.....असा दिसत होता????"
मी वर पाहिले....समोर ती ऊभी होती. काळी साडी...केस मोकळे सोडलेले....चेहऱ्यावर नाक,डोळे,ओठ या जागी
फक्त भोके होती...मी जोरात किंकाळी फोडली व बेशुद्ध झाले.
सकाळी शुध्दीवर आले तर घरातील सामान ट्रकमधे
भरत होते....आंम्ही परत आमच्या घरी आलो....अगदी
गळत होते तरी ताडपत्री प्लँस्टीक लावून राहीलो....
आता कुणीच कुणाशीही त्याबद्दल बोलत नाही..
कारण सगळ्यांना च ती दिसली होती.विश्वास बसला
होता....हो भुते असतात.मला प्रुव्ह करायची गरज नव्हती.
काही दिवसांनी...त्या जागेच्या शेजारच्या बाई भेटल्या.
त्यांच्या कडून समजले.....
घरमालकांची मुलगी होती....नेहमी एकच एक काळी साडी
नेसून दारात बसायची....ती वेडी होती...तिचा खून झाला
तिच्या डोक्यात दगड घालून मारलेडोळे नाक,तोंड ठेचले होते . ओळखता येत नव्हते....कुणी तिला फसवले???
कुणी मारले????काही च माहीत नाही.... वेडी असली
तरी सगळ्याच इच्छा अत्रुप्त राहिल्याने..... ती भूत बनून
परत आली....त्या घरात कोणीही राहत नाही.

हे ऐकून मी सुन्न झाले. त्या काळ्या दरवाज्या मागचे
रहस्य आज मला कळले.
समाप्त
 
Top